- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana : या तारखेला किती वाजता जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana : या तारखेला किती वाजता जमा होणार जुलै महिन्याचा हप्ता? मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती
मुंबई : महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये सन्मान निधी म्हणून दिला जातो. परंतु, जुलै महिना संपला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पण आता मंत्री अदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केली आहे.

किती रुपये मिळणार?
महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. परंतु जुलै महिना संपूनही योजनेचा हप्ता प्राप्त न झाल्यामुळे महिलांमध्ये चिंता पसरली होती. अखेर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
कोणत्या वेळेला जमा होणार?
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नेत्या आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचा ट्विटर) वर पोस्ट करत जाहीर केलं आहे की, जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. म्हणजेच ८ ऑगस्टला सायंकाळी हा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
वेळेत महिला मदत मिळणार
आदिती तटकरे म्हणाल्या, “लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने या योजनेतील जुलै महिन्याचा सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून संबंधित महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.” या घोषणेमुळे अनेक महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी घरखर्चासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. यामुळे सरकारकडून वेळेवर मदत मिळत असल्याची जाणीव महिलांना होईल, अशीही अपेक्षा आहे.
२१ ते ६० वयोगटातील महिला
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम असून या योजनेच्या अंतर्गत राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे.सदर योजना सुरू झाल्यानंतर लाखो महिलांनी नोंदणी केली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. पात्र महिलांची पडताळणी झाल्यानंतर त्यांना नियमितपणे सन्मान निधी देण्यात येतो.
देवाभाऊंची बहिणींना भेट
रक्षाबंधन हा स्नेह, प्रेम आणि बांधिलकीचा सण आहे. अशा दिवशी महिलांना त्यांचा आर्थिक हक्क वेळेवर मिळणं, ही सरकारकडून दिली जाणारी एक सकारात्मक आणि संवेदनशील बाब ठरते. आदिती तटकरे यांच्या घोषणेमुळे सरकारच्या या उपक्रमाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, ही योजना महिलांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

