Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मंगळवारी पावसाचा जोर वाढणार असून, २६ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Manoj Jarange Patil : मुंबई उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मुंबईकरांना त्रास न देण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना गावी परतण्याचा आदेश देत, आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला असून, आरक्षणाची रचना कोलमडेल असा इशारा दिला.
Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर आणि मुंबईतील तणावावर भूमिका मांडली. दुकाने बंद करण्याचा आदेश सरकारने न देता व्यापाऱ्यांनी स्वतःहून दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
Bombay High Court's Stern Order to Maratha Protestors: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याने हायकोर्टाने आंदोलकांना आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील मराठा आरक्षण उपोषणावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल कोर्टाने सरकारला जबाबदार धरले आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सध्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अशा वेळी काही समाजविघातक शक्ती त्यांना टार्गेट करु शकतात. पण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अशा वेळी काय होणार..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेलं उपोषण आज चौथ्या दिवसात पोहोचलं आहे. सरकारकडून अजूनही तोडगा निघालेला नसल्याने त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील काही प्रमुख रस्ते १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५ नंतर बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता आणि इतर काही रस्त्यांवर वाहतुकीस बंदी असेल.
Maharashtra Rain Alert: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे.
Maharashtra