काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे संजय निरुपम कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खरंतर, पक्षाने निरुपम यांचे स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव हटवले होते.
महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे. या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या निवडणुकीत आम्ही राज्यात 45 च्या पार जाऊ असा दावा केला आहे.
भाजपला महाराष्ट्रात झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंतर, तिकीट कापल्याने नाराज असलेले उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीत पाच जागांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी पहाटे एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुकानाच्या वरच्या बाजूस राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याच्या राजकारणात फार मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या पत्ता कट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून कोणाला लोकसभा उमेदवारी दिली जाणार याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे.
आधार कार्डच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात आले आहे.
कचाथीवू प्रकरणात सध्या भाजप आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.