शिस्तप्रिय म्हणून देवगड दिंडी प्रसिद्ध, ओळीने चालतात वारकरी
Maharashtra Jun 23 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
शिस्तीच्या बाबतीत महाराष्ट्रात एक नंबर दिंडी
देवगड दिंडी ही शिस्तीच्या बाबतीत महाराष्ट्रात क्रमांक एकवर असणारी दिंडी आहे. करंजीच्या घाटात चालताना या दिंडीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Image credits: social media
Marathi
भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली निघते दिंडी
भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघते. या दिंडीची सुरुवात देवगड श्री गुरु देव दत्त येथून होत असते.
Image credits: social media
Marathi
दिंडीत किती वारकऱ्यांचा समावेश असतो?
दिंडीत चालताना पुरुष आणि महिला दोनही वारकरी सोबत चालत असतात. या दिंडीमध्ये जवळपास १ हजार ४०० वारकरी चालतात आणि ते चालताना एका ओळीत चालत असतात.
Image credits: social media
Marathi
दिंडीचे 51वे वर्ष
दिंडीचे हे 51वे वर्ष असून या दिंडीचा रिंगण सोहळा नेवासा येथे पार पडत असतो. यावेळी मान्यवर मंडळी आणि वारकरी उपस्थित राहतात.
Image credits: social media
Marathi
भास्करगिरी महाराज काय म्हणतात?
प्रत्येकाने आपल्या कामामध्ये पांडुरंग शोधावा, तीच खरी विठ्ठलभक्ती आहे. विठ्ठलाकडे संपूर्ण महाराष्ट्रासाठी चांगल्या पावसाची व बळीराजा सुखी होवो यासाठी साकडे घालणार आहे.