सार

Government Medical College at Ratnagiri : रत्नागिरी येथे ३० नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Government Medical College at Ratnagiri : रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 30 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळेस दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन 'नमो 11 सुत्री' (NAMO 11 Sutri Programme) कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.

“सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयी-सुविधा (Health facilities) उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) अपग्रेड करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील”, असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

“आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे”

आरोग्य विभागावर लक्ष केंद्रीत केले आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या, त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची (Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana) रक्कम 5 लाख रूपयांवर वाढवली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाद्वारे 1 कोटी 80 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे”, अशीही माहिती यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिली.

Photos: रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

View post on Instagram
 

“सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले कटिबद्ध”

“कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला (Ratnagiri Airport) 118 कोटी रूपये मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमधून 160 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान झाले आहे. पण बळीराजाने चिंता करू नये. सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबद्ध आहे. 'नमो 11 सुत्री' कार्यक्रम सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे”. असेही मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले.

पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस

यावेळेस वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, “अनेक वर्षांची मागणी या महाविद्यालयामुळे पूर्ण झाली. भविष्यात टप्प्या-टप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. बीएससी नर्सिंग महाविद्यालयही या महाविद्यालयात सुरू केले जाईल.

 

आणखी वाचा :

Coca Cola's New Plant In Konkan : कोकणात हिंदुस्तान कोका कोला कंपनीच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यानी केले भूमिपूजन

Farming Tips : बियाणे-खते खरेदी करताना या गोष्टींकडे करताय दुर्लक्ष? होईल मोठे नुकसान

Wildlife Conservation Importance : …तर नागरिकांनी वनव्यवस्थापनाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचं