Cleanliness Drive : मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महत्त्वाची – मुख्यमंत्री

| Published : Dec 04 2023, 05:30 PM IST / Updated: Dec 05 2023, 12:30 AM IST

Mumbai

सार

Cleanliness Drive : संपूर्ण स्वच्छता मोहीम मुंबईकरांच्या सहभागातून लोकचळवळ व्हावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Cleanliness Drive For A Swachh Bharat : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Cm Eknath Shinde In Mumbai) यांच्या उपस्थितीत रविवारी ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महापालिकेतर्फे (Mumbai Municipal Corporation) आयोजित संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी डी वॉर्डातील कमला नेहरू उद्यान, बाणगंगा तलाव, गिरगाव चौपाटी, बी.आय.टी. चाळ परिसरातील कामांची पाहणी केली. यावेळी बी.आय.टी. चाळ परिसरातील स्थानिकांशीही त्यांनी संवाद साधला.

“मुंबई स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त करण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. संपूर्ण स्वच्छतेचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी या मोहिमेत सर्वसामान्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. यात मुंबईकरांनी सहभागी होऊन या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे”, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केले.

‘मुंबईचा कायापालट करण्यासाठी मोहीम महत्त्वाची’

यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ केला, त्यांनी हातात झाडू घेत सर्व देशवासीयांना अभियानात सहभागासाठी प्रेरित केले. बघता – बघता ही लोकचळवळ बनली. मुंबईचा कायापालट करण्यासाठी देखील ही मोहीम महत्त्वाची आहे. मुंबईतील रस्ते स्वच्छता (Road Cleanliness In Mumbai), प्रदूषण नियंत्रण (Pollution Control) अशा विविध पातळीवर या मोहिमेत काम करण्यात येत आहे”.

 

View post on Instagram
 

 

सफाई कामगारांच्या वसाहतीला दिली भेट

मुख्यमंत्र्यांनी या मोहिमेदरम्यान सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट दिली. या वसाहतीत असणाऱ्या समस्या सोडवण्याचे काम सुरू झाले आहे. जे सफाई कर्मचारी (Cleaning Staff) बांधव मुंबई स्वच्छ ठेवतात, त्यांच्या वसाहती देखील स्वच्छ सुंदर असायला हव्यात, असा आमचा प्रयत्न आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

बाणगंगा तलाव परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी (Inspection Of Banganga Lake Area By Chief Minister)

मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बाणगंगा तलाव (Banganga Lake Mumbai) परिसरातील स्वच्छता मोहिमेचीही मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तलाव परिसरात सुशोभिकरणाबाबत (Beautification) मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला (Communication With Cleaning Staff) तसेच त्यांच्यासोबत देखील फोटो काढले.

आणखी वाचा :

Sion Hospital News : सायन हॉस्पिटलमध्ये लवकरच 1200 खाटा होणार उपलब्ध - मुख्यमंत्री

Ratnagiri Government Medical College : रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Farming Tips : बियाणे-खते खरेदी करताना या गोष्टींकडे करताय दुर्लक्ष? होईल मोठे नुकसान