सार

Sion Hospital News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटलला भेट देत तेथील सोयीसुविधांची पाहणी करत रूग्णांचीही चौकशी केली. 

Sion Hospital News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (3 डिसेंबर 2023) महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला (Lokmanya Tilak Hospital) भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करत रूग्णांचीही विचारपूस केली.

“सायन हॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) अतिदक्षता विभागातील 200 खाटांचे आणि सर्वसाधारण कक्षेमधील एक हजार खाटांचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल त्यामुळे नव्याने 1200 खाटा उपलब्ध होतील”, अशी माहितीही यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

“हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढील भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे. रुग्णालयात सोयीसुविधा वाढवण्यात येत आहे, पण त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. तसेच रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा (Medical Help) मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करावेत”, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

रूग्णांशी साधला संवाद

रुग्णालयाची पाहणी करत मुख्यमंत्र्यांनी रूग्णांशी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचेही यावेळेस त्यांनी सांगितले. रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होते का? याविषयी देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली.

सोनोग्राफी (Sonography) आणि डायलेसिस (Dialysis) सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार असल्याचेही यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झीरो प्रीस्क्रिप्शन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही, असेही विधानही यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

Photos: मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची सायन रूग्णालयाला भेट

View post on Instagram
 

डॉक्टरांचे केले कौतुक

रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही त्यांनी तोंडभर कौतुक केले. तसेच रुग्णांना वेळेवर औषध, जेवण मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यादरम्यान हॉस्पिटलमधील स्वयंपाकगृहाची पाहणी करताना तेथील स्वच्छता व अन्नाची गुणवत्ता याबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

आणखी वाचा :

Ratnagiri Government Medical College : रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बाल स्वास्थ्य योजना गांगुर्डे कुटुंबासाठी ठरली संजीवनी! मुलाला श्रवणशक्ती मिळाल्याने आयुष्यच बदललं

वाचनाची आवड आहे? राज्याच्या या शहरात उभारलीय चक्क पुस्तकांची बाग