सार
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याशिवाय शुक्रवारपासून (26 एप्रिल) मुंबई, ठाण्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. तरीही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यासाठी शुक्रवारपासून (26 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तरीही महायुतीत अर्ध्यापेक्षा अधिक जागांवरील उमेदवार ठरलेले नाहीत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागा वाटपाचेही ठरत नाहीये. सर्वाधिक वाईट स्थिती मुंबईतील सहा जागांसाठीची आहे. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन जागांवरून लढण्याची घोषणा केली आहे. भाजपाने दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेने एका जागेवरील उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली आहे. अन्य तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
जागा वाटपाचा तिढा कायम
महायुतीमध्ये जागा वाटाचा तिढा कायम आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार म्हटलेय की, मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागांवर भाजपा आणि उर्वरित तीन जागांवर शिवसेनेकडून निवडणूक लढवली जाईल. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी असेही स्पष्ट केलेय, ठाणे आणि कल्याण जागेवर शिवसेना उमेदवार असेल. कारण ठाणे, कल्याणमधील जागेवर आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. दुसऱ्या बाजूला भाजपाकडून असा प्रयत्न केला जातोय की, दक्षिण मुंबई किंवा उत्तर-मुंबईतील जागा त्यांना मिळावी.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपामध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने दक्षिण मुंबईतील जागा, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक येथील जागेवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. खरंचर भाजपाने उत्तर मुंबईतून पियूष गोयल आणि उत्तर पूर्व लोकसभा जागेवरून मिहिर कोटोचा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेने
13 जागांवर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. यापैकी मुंबईतील सहा जागा, ठाणे-पालघर जिह्यातील चार आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 3 मे आहे. उमेदवारी अर्जांची पडताळणी 4 मे रोजी होणार आहे. 6 मे पर्यंत नावे मागे घेता येणार आहेत. याशिवाय 18 मे रोजी संध्याकाळी वाजेपर्यंत प्रचाराच्या तोफा थंडावणार असून 20 मे रोजी मतदान होणार आहे.
या जागांसाठी भरला जाणार उमेदवारी अर्ज
उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभेच्या जागेवर उमेदवारी भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे.
आणखी वाचा :