सार

Lok Sabha Election 2023 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे. लोकसभेच्या 8 मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे.

Lok Sabha Election 2023 : महाराष्ट्रातील आठ लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे. यावेळी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी येथे मतदान होणार आहे. याआधी 19 एप्रिलला राज्यातील रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपुर येथे मतदान झाले होते. अशातच नांदेड आणि अमरावती येथे दुसऱ्या टप्प्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षे काँग्रेसचा गड राहिलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात एण्ट्री केली होती.

नांदेड लोकसभा जागेवर होणार चुरशीची लढत
भाजपाने खासदार प्रताप पाटिल चिखलीकर यांना लोकसभेच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीतील वसंत चव्हाण निवडणुकीचे तिकीट दिले आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने नांदेडच्या जागेवरून अविनाश भोसिकर यांना तिकीट दिले आहे. यामुळे नांदेड जागेवरून प्रताप पाटिल चिखलीकर आणि वसंत चव्हाण यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

नांदेड लोकसभेच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी भाजपाने अशोक चव्हाण यांच्याकडे दिली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काँग्रेसची मत विभागली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. याचा संपूर्ण फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मिळू शकतो अशीही चर्चा सुरू आहे.

अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरूद्ध बळवंत वानखेडे
अमरावती जागेवर काँग्रेसने आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते बळवंत वानखेडे यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. येथे विद्यमान खासदार नवनीत कौर राणा आहे. सध्या नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना पक्षाने अमरावतीतून तिकीट दिले आहे. याआधी नवनीत राणा यांनी अमरावती येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत जिंकली होती.

अकोल्यातील जागेची स्थिती
अकोल्यातील लोकसभेच्या जागेवर भाजपाने अनूप धोत्रे आणि काँग्रेसने अभय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष मुस्लीम मतदारांवर आहे.

बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम सीट
बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम अशा दोन जागा आहेत जेथे शिवसेनेमध्ये पहिल्यांच फूट पडल्याचे दिसून आले आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये लढत होणार आहे. बुलढणा येथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नरेंद्र खेडेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यवतमाळ जागेवरून एनडीएने राजश्री पाटील आणि इंडिया आघाडीने संजय देशमुखने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

500 रुपयांत गॅस सिलेंडर, शासकीय नोकरीत महिलांना आरक्षण....शरद पवारांच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्यात या मोठ्या घोषणा

आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला निशाणा, म्हणाले..…