500 रुपयांत गॅस सिलेंडर, शासकीय नोकरीत महिलांना आरक्षण....शरद पवारांच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्यात या मोठ्या घोषणा

| Published : Apr 25 2024, 01:06 PM IST / Updated: Apr 25 2024, 01:12 PM IST

sharad pawar
500 रुपयांत गॅस सिलेंडर, शासकीय नोकरीत महिलांना आरक्षण....शरद पवारांच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्यात या मोठ्या घोषणा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

NCP Sharad Pawar Manifesto : शरद पवारांच्या गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा गुरुवारी (25 एप्रिल) प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

NCP Sharad Pawar Manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या गटाने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यातून महिलांच्या संरक्षणासाठी काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG Gas Cylinder Price) कमी केल्या जातील असेही आश्वास जाहीरनाम्यात दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या जाहीरनाम्याचे नाव 'शपथ पत्र' असे ठेवण्यात आले आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?
शरद पवारांच्या गटातील नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले की, “आम्ही आज (25 एप्रिल) जाहीरनामा प्रकाशित केला आहे. यामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे आमच्या नेत्यांकडून संसदेत उपस्थितीत केले जातील. याशिवाय, आमचे सरकार आल्यास जातीय जनगणना करू. शासकीय नोकरीत महिलांना आरक्षण देऊ. याव्यतिरिक्त अग्निवीर योजना रद्द करण्यावर काम केले जाईल. न्यायव्यवस्थेला आधुनिक रुप देण्याचे काम करू.”

शरद पवारांच्या जाहीरनाम्यात काय म्हटलेय?

  • गॅसच्या किंमती 500 रुपयांपर्यंत केल्या जातील.
  • पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करू.
  • केंद्र सरकारमध्ये 30 शासकीय नोकर भरती केली जाईल. आम्ही सत्तेत आल्यास रिक्त पदांवरही भरती होईल.
  • शासकीय नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाईल.
  • राज्यासाठी एकच कर अशी सुविधा असावी. जणेकरून राज्याला कर लावण्याचा अधिकार मिळेल.
  • डिग्री आण डिप्लोमा पास केल्यानंतर विद्यार्थ्यांना 8500 रुपायांची स्कॉरलशिप दिली जाईल.
  • शाळा-महाविद्यालयांमध्ये सेफ्टी ऑडिट केले जाईल.
  • शेतकऱ्यांनी किसान आयोगाची स्थापन करू.
  • आम्ही खासगी महाविद्यालयात आरक्षण मिळण्यासाठी काम करू.
  • आम्ही अग्निवीर योजना बंद करू.
  • प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला एक लाख रुपये देऊ.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल.
  • जेष्ठ नागरिकांसाठी एका आयोगाची स्थापना करू.
  • आरोग्यासाठी बजेट 4 टक्क्यांपर्यंत असेल.
  • कृषी आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लावला जाईल.

वंदना चव्हाण यांनी काय म्हटले?
राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी म्हटले की, "शरद पवारांच्या जाहीरनाम्यात तरुण, महिला, तरुणी, शेतकरी, श्रमिक आणि अल्पसंख्यांचा विचार केला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी जाहीरनामा तयार करण्यासाठी माझी खूप मदत केली. याशिवाय जाहीरनामा अनेकांकडून माहिती मिळूनच तयार केला आहे."

आणखी वाचा : 

'शेतकऱ्यांची माफी मागा...' अमित शाहांच्या विधानावर शरद पवारांचे प्रतिउत्तर, म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : अमरावतीत प्रचार सभेवरून वाद; सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

 

Read more Articles on