एमिरेट्सच्या विमानाने लँडिंग होताना फ्लेमिंगो पक्षांना दिली धडक, 40 पक्षांचा झाला मृत्यू

| Published : May 21 2024, 10:44 AM IST / Updated: May 21 2024, 11:03 AM IST

flamingos

सार

सोमवारी संध्याकाळी विमानाला धडक दिल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी ठार झाले आहेत. एमिरेट्स कंपनीचे विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला असून त्या पक्षांचे पोस्टमार्टम करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सोमवारी संध्याकाळी विमानाला धडक दिल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी ठार झाले आहेत. एमिरेट्स कंपनीचे विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला असून त्या पक्षांचे पोस्टमार्टम करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अलीकडच्या काळात फ्लेमिंगोच्या मृत्यूमध्ये वाढ झालेली असली तरी विमान अपघातात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही घटना घडली तेव्हा रात्रीचे 8:30 वाजले होते. 

वैमानिकाने दिली माहिती - 
या झालेल्या अपघाताची माहिती वैमानिकाने दिली आहे. त्याने माहिती देताना सांगितले आहे की, विमानाचे लँडिंग करता असताना विमानाच्या फ्युजलजवळ पक्षांचे थवे दिसले होते. यावेळी झालेल्या अपघातातच या पक्षांचा मृत्यू झाला आहे. विमानाला या पक्षांचे थवे धडकल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. या अपघटनानंतर पक्षांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. 

रहिवाशांना झाला त्रास - 
फ्लेमिंगो पक्षांचे अवशेष खाली पडल्यामुळे रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला. वनविभागाने रात्रभर अपघात झालेल्या विविध ठिकाणी फिरून पक्षांच्या शरीराचे अवशेष जमा केले. मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षांचे अपघात झाले नाही. पण अटल सेतूचे बांधकाम झाल्यामुळे पक्षांनी त्यांचा मार्ग बदलला होता. मुंबईत काही दिवसांपासून फ्लेमिंगो पक्षांच्या अपघातात वाढ झाली आहे. 
आणखी वाचा - 
रत्नागिरीत कारने 2 तरुणांना उडवले, सुदैवाने दोन्ही तरुण बचावले
पुणे येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला अटक, पळून जात असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये पकडले