रत्नागिरीत कारने 2 तरुणांना उडवले, सुदैवाने दोन्ही तरुण बचावले

| Published : May 20 2024, 07:29 PM IST

accident news 02.jpg

सार

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय. मात्र दोन्ही तरुण बोनेटवर आदळल्याने सुदैवाने बचावले. कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, हा चित्तथरारक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहरात सामान खरेदी करून दोन तरुण बसस्थानकाकडे जात असतानाच अचानक पाठीमागून आलेल्या कारने लागोपाठ दोन तरुणांना उडवले. परंतु सुदैवाने दोन्ही तरुण गाडीच्या दर्शनी भाग बोनेटवर आदळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार भरधाव वेगात नसल्याने सुदैवाने दोन्ही तरुण बचावले आहेत. परंतु तरुणांना उडवणाऱ्या कारचालकाला मात्र नागरिकाच्या रोशाला बळी पडावे लागले. काही काळ वातावरणही तंग झाले होते. मात्र काही लोकांच्या मदतीने प्रकरण निवळल्याचे बोलले जात आहे.

पुण्यात बिल्डरच्या मुलाच्या कारने दोघांना चिरडलं

पुण्यात रविवारी बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या कारने दोन तरुणांना चिरडलंय. कारने दिलेल्या धडकेत दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला जमावान चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने तरुणांना उडवल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे बिल्डरच्या मुलाला जामीन देखील मिळालाय. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलच तापताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.