सार
पुणे येथील कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
पुण्यात शनिवारी रात्री घडकलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन असलेल्या मुलाच्या हातात कार दिल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गायब झाला होता पण नंतर त्याला ताब्यात घेण्यात आली आहे.
विशाल अग्रवाल यांना घेतले ताब्यात -
विशाल अग्रवाल यांच्या मुलाने दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवत दोघांना उडवले आहे. यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठा यांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पुणे येथील कल्याणीनगर परिसरात हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला दहा तासांनी जामीन दिला होता. जामीन देताना पाच अटींचे पालन करावे अशी अट घातली होती. त्यामुळे लोकांनी टीका केली आणि विशाल अग्रवालला अटक करण्यात आली.
विशाल अग्रवालला अटक करण्यासाठी पोलीस पथके झाली होती रवाना -
विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नॉट रिचेबल झाला होता. त्याच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली. पुणे, रत्नागिरी, दौंड आणि शिरूर या भागात त्याचा तपास केला जात होता. पुणे पोलिसांना तो सापडत नव्हता, पण नंतर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती समजली. त्याला गाडीतूनच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आणि पुण्यात घेऊन गेले. त्याला आता कोर्टात दाखल केले जाणार आहे.
आणखी वाचा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत 25 हजार महिलांशी संवाद साधणार, रॅलीतील महिलांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आयोजित केला कार्यक्रम
छत्तीसगडमध्ये मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, १७ जण ठार