पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान? प्रवाशी आणि कर्मचारी सुखरूप

| Published : May 17 2024, 07:35 PM IST / Updated: May 17 2024, 07:36 PM IST

air india flight 02.j

सार

पुणे विमानतळावरील एअर इंडियाच्या एअरबसने टोईंग करणाऱ्या वाहनाला धडक दिली असून विमानातील प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्यात आले असून विमानाची तपासणी करण्यात येत आहे. 

पुणे विमानतळावर एक दुर्घटना घडली आहे. दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची काल पुणे विमानतळावर धावपट्टीच्या दिशेने ट्र्क जात असताना ट्रकला धडक बसली. यावेळी विमानात 180 प्रवासी बसलेले होते. या झालेल्या घटनेची माहिती विमानतळ अधिकाऱ्याने मीडियाला दिली आहे. त्याने म्हटले आहे की, "प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या तोंडाला आणि लँडिंग गिअरजवळील टायरला नुकसान झाले होते. टक्कर होऊनही विमानातील सर्व प्रवाशी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती त्याने दिली आहे. 

विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दिला दुजोरा - 
पुणे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी या झालेल्या घटनेबाबाबत दुजोरा दिला आहे. प्रवाशांना तात्काळ विमानातून उतरवण्यात आले आणि त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असे यामध्ये सांगण्यात आले आहे. येथे टक्कर कशा प्रकारे झाली आणि त्यामागे काय कारण होते हे शोधण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालात टॅक्सी चालवण्याच्या वेळी विमानाला जमिनीवर चालवण्यासाठी वापरात येणाऱ्या टग ट्रकने विमानाला धडक दिली आहे. 

विमान ऑपरेशनसाठी तयार - 
विमानाची तपासणी करून ते ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे पुढील अपडेट्स मिळणे अपेक्षित आहेत. विमान कंपनीने एक निवेदन दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, पुशबॅकच्या वेळी एका विमानाशी संबंधित एक घटना घडली होती, ते विमान पुणे आणि दिल्ली दरम्यान चालवले जायचे. एअरलाईनने निवेदन दिले असून त्यामध्ये माहिती दिली आहे. 

एअरलाईनने काय निवेदन दिले? - 
एअरलाईनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "विमान तपासणीसाठी मागे ठेवण्यात आले असून सर्व प्रवासी सुखरूप आणि सुरक्षित आहेत. सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्यात आले असून त्यांना परत जाण्यासाठी विमानाची सोय करून देण्यात आली आहे. 
आणखी वाचा - 
मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णालयात केले दाखल, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची नाशिकला हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?