सार

मनोज जरांगे हे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक आणि सभा घेत असताना आजारी पडले आहेत. त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. 

महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे यांनी त्यांच्या सभांचा धडाका लावला असून बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांनी याआधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले होते. त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता आंदोलन केले होते. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान मनोज जरांगे हे आजारी पडले आहेत. 

मनोज जरांगे कसे आजारी पडले? - 
मनोज जरांगे यांची येत्या 8 जूनला बीडमध्ये अतिशय भव्य सभा घेण्यात येणार होती. तसेच जरांगे हे 4 जूनला उपोषणाला बसणार आहेत, मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे मनोज जरांगे यांनी सभा पुढे ढकलली आहे. सभेच्या दरम्यान लोकांची तारांबळ होऊ नये म्हणून सभा रद्द करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषणाचा निर्णय पुढे ढकलला असून पुढील तारीख लवकरच कळवली जाणार आहे. या दरम्यानच मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार चालू आहेत. 

मराठवाड्याच्या दौऱ्यावर मनोज जरांगे - 
मनोज जरांगे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर त्यांनी सभा घेतल्या होत्या. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर मनोज जरांगे यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवल्याचे सांगितले आहे. या आधी मनोज जरांगे यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्येच उपचार करण्यात आले होते. 

मनोज जरांगे याआधी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये होते दाखल - 
मनोज जरांगे याआधी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना परत एकदा याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांनी याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन केले आहे. त्यांच्या काही मागण्या वाशी येथील सभेत मंजूर केल्या होत्या. मनोज जरांगे यांची तब्येत स्थिर असून ते लवकरच बरे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 
आणखी वाचा - 
चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ आणि रिल्स शूट करण्यावर बंदी, 31 मार्चपर्यंत VIP दर्शनही नाही
Swati Maliwal Case : स्वाती मालिवाल यांच्यावर रात्री उशिरापर्यंत वैद्यकीच चाचणी, वाचा प्रकरणातील आतापर्यंतची टाइमलाइन