Parliament Session Economic Survey 2024 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी NEET परीक्षेबाबत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी NEET तसेच परीक्षा पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, ज्याला शिक्षणमंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांचे नाव न घेता ते म्हणाले की, पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांचा गळा दाबण्यात आला.
Maharashtra Rain Updates : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व विदर्भात सोमवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Indian Railway Bharti 2024 : रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईने क्रीडा कोट्याअंतर्गत अनेक पदांसाठी भरती जाहीर केली असून यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे.
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोमवारी एआय मधून तयार केलेला व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवले आहेत.
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून 12 ऑगस्टपर्यंत 19 बैठका होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि आज आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. अधिवेशनात सरकार सहा विधेयके मांडणार आहे.
कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आणि पहिल्या कृष्णवर्णीय तसेच भारतीय वंशाच्या महिला आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवार ठरलेल्या हॅरिस यांचा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सामना आहे.
Amit Shah on Uddhav Thackeray : पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Konkan Heavy Rain : रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात सकाळपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात वाद सुरु आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात द्वंद्व दिसून येत आहे. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे.