मनोज जरांगे यांनी राजकारणात यावे, मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो

| Published : Jul 21 2024, 04:13 PM IST

prasad lad and manoj jarange

सार

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजात वाद सुरु आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात द्वंद्व दिसून येत आहे. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले आहे. 

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद सुरु आहे. यामध्ये मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात द्वंद्व सुरु असल्याचे दिसून आले आहे. गोरगरीब जनतेला महिन्याला दीड ते तीन हजार रुपये मिळत असतील तर मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिला पाहिजे. जर मनोज जरांगे यांना राजकारण करायचे असेल तर मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो, त्यांनी राजकारणात यावे असेही यावेळी लाड यांनी म्हटले आहे. 

प्रसाद लाड काय म्हणाले? - 
प्रसाद लाड यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे की,मनोज जरांगे यांनी राजकारणात यावं, आमदार व्हावं आणि एका सहकार्याला सोबत घेऊन आमदार करावे. आम्ही त्यांना विधानपरिषदेत आमदार होण्यासाठी मदत करू. पण मी समाजकारण करणार, राजकारण करणार नाही आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करायची हे योग्य नाही. चर्चेला या, चर्चेतून मार्ग काढू. मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षातील नेते का आले नाही? - 
सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्ष का आले नाही, याबाबतचा जाब मनोज जरांगे यांनी विरोधी पक्षांना विचारायला हवी. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पाटोळे विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे हे कार्यक्रमाला आले नाहीत. यावेळी या सर्वांना जरांगे हा प्रश्न का विचारत नाही असेही त्यांनी यावेळी विचारले आहे. मनोज जरांगे यांना कोणीतरी चुकीचं सांगत आहे असं यावेळी म्हटले आहे.