सार

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सोमवारी एआय मधून तयार केलेला व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवले आहेत. 

जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी एक व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रामुख्याने जगभरातील जे पॉवरफुल नेते आहेत त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या व्हिडिओत एआयच्या मदतीने फॅशन रॅम्प वर चालताना नेत्यांना दाखवले आहे. ज्यो बायडेन, डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांना यामध्ये दाखवण्यात आले आहे. 

याला कॅप्शन देताना मस्क यांनी फॅशन जगतातील एआय हा काळ मोठा असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पोप फ्रान्सिस यांना दाखवण्यात आले आहे. त्यांनी यामध्ये हिवाळी कपडे घातले असून त्यांच्या कपड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविधरंगी ड्रेस घातला असून त्यांना या व्हिडिओमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

त्यांनी यानंतर ट्रम्प आणि बराक ओबामा यांना दाखवले आहे. बराक ओबामा यांच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये सर्वांचे कपडे बदलत असून मस्क यांनी त्यांच्या कंपनीचा लोगो असलेला जॅकेट घातला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले आहे. जगभरातून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.