पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ असणाऱ्या जगदंब हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे या तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.या प्रकरणाचा उलगडा झाला असून ग्रामीण पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी ईडीकडून काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार आहे. खरंतर, ईडीकडून 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
दहा वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. या कार्यक्रमातील सगळ्याच विनोदी कलाकारांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करत मालिकेने निरोप घेतला आहे.
मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. खरंतर, केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या प्राधिकरणाने पशूंच्या मृत्यूसंदर्भातील रिपोर्ट जारी केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. दिल्ली जल बोर्डाचा हा घोटाळा असून यामधून आलेल्या पैशांमधून आम आदमी पक्षाला निधी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तेलंगणाच्या राज्यपालांनी राजीनामा दिला असून त्या लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सुश्री सुंदरराजन या पॉंडिचेरी येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
मुंबईतील एका व्यक्तीने घरातील वीज कापली जाण्याच्या भीतीपोटी तीन लाख रुपये गमावले आहेत. खरंतर हे प्रकरण जुहू येथील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या दाक्षिणात्य राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणा येथील सभेतून इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
निवडणूक रोख्यांबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला लपवाछपवी न करता संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. येत्या 21 मार्चच्या संध्याकाळपर्यंत बँकेने सर्व माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) द्यावी.
प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये दुर्मिळ सापांसह त्यांचे विष पुरवण्याचा आरोप होता. अशातच एल्विशने आपला गुन्हा मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.