शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास दिसू लागतात हे 5 संकेत

| Published : Nov 21 2024, 08:42 AM IST

5 signs of protein deficiency
शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास दिसू लागतात हे 5 संकेत
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंर काही प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यामुळे डॉक्टरांना वेळीच भेटणे आवश्यक आहे. जाणून घेऊया प्रोटीनच्या कमतरतेमुळे कोणते संकेत दिसतात याबद्दल सविस्तर...

5 Protein Deficiency Signs : प्रोटीन आपल्या शरिरातील एक महत्वपूर्ण पोषण तत्त्व आहे. याच्या मदतीने शरिरातील स्नायूंना बळकटी मिळण्यासह अन्य कार्ये सुरळीत पार पडण्यास मदत होते. दरम्यान, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे काहीजणांच्या शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्याचे दिसून येते.

प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरिरात काही समस्या निर्माण होऊ शकतात. याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होतो. याच समस्या लहान मुलं ते वृद्धांपर्यंत होऊ शकतात. अशातच तुमच्या शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झालीय हे ओखळण्यासाठी पुढील काही संकेत तुम्हाला नक्कीच दिसतील.

स्नायू कमकूवत होणे
प्रोटीनचे शरिरातील मुख्य कार्य म्हणजे स्नायूंना बळकटी देणे. ज्यावेळी शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण होते तेव्हा स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि शरिरात थकवा जाणवू लागतो. अशातच कोणत्याही हालचालीशिवाय तुम्हाला थकवा जाणवत असल्यास हे संकेत शरिरात प्रोटीनची कमतरता असल्याचे दाखवून देते.

केस गळतीची समस्या
प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस गळतीची देखील समस्या उद्भवली जाऊ शकते. प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य राखले जाते. कारण केसांच्या 90 टक्के भागामध्ये प्रोटीन असते. ज्यावेळी प्रोटीनची कमतरता निर्माण होते तेव्हा केस कळती आणि केस तुटण्यास सुरुवात होते.

त्वचेसंबंधित समस्या
प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्वचेसंबंधित समस्याही निर्माण होऊ शकते. शरिरात पुरेशा प्रमाणात प्रोटीन नसल्यास त्वचेचा रंग बदलला जातो. प्रोटीनमुळे शरिरात कोलेजन निर्माण होते.

वारंवार आजारी पडणे
प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमकूवत होण्यास मदत होते. यामुळे तुम्ही सतत आजारी पडू लागता. सर्दी-खोकला आणि अन्य संक्रमित आजार होण्याची शक्यता अधिक वाढली जाते.

अत्याधिक थकवा जाणवणे
प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरिराला उर्जा मिळत नाही. अशातच थकवा जाणवू लागतो. जर तुम्हाला दररोज काही न करता थकल्यासारखे जाणवत असल्यास हे देखील संकेत शरिरात प्रोटीनची कमतरता असल्याचे आहेत.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

वापरलेली चहापावडर फेकू नका, केस ते कपड्यांसाठी असा करा वापर

अळशीच्या बियांचे सेवन करणे पुरुषांसाठीही ठरेल वरदान, वाचा फायदे