लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षांच्या एकमेकांसोबत युती आणि आघाडी होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही दिल्लीत जाऊन पोहचले आहेत. ते महायुतीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध फंडे शोधून काढत असून मर्चन्डाईजचा त्यामध्ये भर पडली आहे.
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकार आणि आगळीवेगळी स्टोरी या चित्रपटुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २९ मार्च रोजी चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध होणार आहे.
घराची कितीही स्वच्छता राखली तरीही काही कोपरे अस्वच्छ असल्यासारखे वाटतात. अशातच स्वयंपाकघरातही दररोज आपण स्वच्छता केली तरीही कधीकधी दुर्गंधी येते. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
बंगळुरूमधील मेघना फूड्स या कंपनीवर गोवा आणि कर्नाटक आयकर विभागाने धाड टाकली आहे.
बंगळुरुतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत मेव्हणाच्या बायकोचा अश्लील व्हिडीओ शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भाऊजीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर स्थानिक कोर्टाने एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
गडचिरोली येथे पोलीस आणि C-60 कमांडोंनी संयुक्त कार्यवाही करत चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबद्दल एक मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जारी केली जाईल.
भारतीय अर्थव्यवस्थेचे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगातील एकूण जीडीपीमधील योगदान वाढणार आहे. अशातच चीनचे जीडीपीमधील योगदान कमी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तिसरी यादी मंगळवारी (19 मार्च) जारी केली जाणार आहे.