सार

Ravindra Berde Passed Away : दिवंगत मराठी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे बुधवारी (13 डिसेंबर 2023) निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

Ravindra Berde Passed Away : सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याच्या ‘सिंघम’ सिनेमातील (Singham) मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे बुधवारी निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे 78 वर्षांचे होते.

दीर्घकाळापासून रवींद्र बेर्डे हे कॅन्सर (Cancer) या आजाराचा सामना करत होते. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले आहे. रवींद्र बेर्डे यांनी बॉलिवूडसह काही मराठी सिनेमांमध्ये देखील काम केले होते.

रवींद्र बेर्डे यांच्याबद्दल हे सांगितले जातेय की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कॅन्सर आजारासंबंधित उपचार सुरू होते. रवींद्र बेर्डे यांना घशाचा कॅन्सर (Throat Cancer) झाल्याचे कळल्यानंतर मुंबईतील टाटा रूग्णालयात (Tata Hospital) भरती करण्यात आले होते.

महाराष्ट्र टाइम्स या वृत्तसंस्थेनुसार, रवींद्र बेर्डे यांना दोन दिवस आधीच रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. पण बुधवारी (13 डिसेंबर, 2023) सकाळी अचानक रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात बायको, दोन मुलं, सून आणि एक नातू असा परिवार आहे.

मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये काम
रवींद्र बेर्डे यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. वर्ष 2001 मध्ये आलेला सिनेमा 'नायक: द रिअल हीरो' मध्ये अनिल कपूरसोबत काम केले होते. त्याचसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या 'सिंघम' सिनेमातही रवींद्र बेर्डे झळकले होते. सिंघममध्ये अजय देवगण हा मुख्य भूमिकेत होता.

याशिवाय रवींद्र बेर्डे यांनी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अशोक सराफ, विजय चव्हाण, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव सारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबतही काम केले होते. रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षात नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. नाटकात काम करतानाच रवींद्र बेर्डे यांना सिनेमांसाठी ऑफर्स येऊ लागले होते.

आणखी वाचा: 

Rajnikant Birthday : रजनीकांत यांचे Net Worth ऐकून व्हाल हैराण

Junior Mehmood : ज्युनिअर मेहमूद यांच्या अंत्यदर्शनासाठी जॉनी लिव्हर, रजा मुरादसह कित्येक कलाकार दाखल

ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास