- Home
- Entertainment
- Junior Mehmood : ज्युनिअर मेहमूद यांच्या अंत्यदर्शनासाठी जॉनी लिव्हर, रजा मुरादसह कित्येक कलाकार दाखल
Junior Mehmood : ज्युनिअर मेहमूद यांच्या अंत्यदर्शनासाठी जॉनी लिव्हर, रजा मुरादसह कित्येक कलाकार दाखल
- FB
- TW
- Linkdin
कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील कित्येक कलाकार त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. शैलेश लोढा, जॉनी लिव्हर यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
ज्युनिअर मेहमूद यांच्या अंत्ययात्रेत बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा देखील सहभागी झाले होते. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
ज्युनिअर मेहमूद यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी बॉलिवूडमधील अभिनेते रजा मुराद आणि अवतार गिल देखील उपस्थित होते. ज्युनिअर मेहमूद यांच्या आठवणींना उजाळा देताना रजा मुराद यांचे डोळे पाणावले.
ज्युनिअर मेहमूद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची दोन्ही मुलेही उपस्थित होते. ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनामुळे जॉनी यांचे कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते.
ज्युनिअर मेहमूद यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गायक सुदेश भोसले आणि मास्टर राजू देखील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
ज्युनिअर मेहमूद यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली देखील उपस्थित होते.
कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांना राकेश बेदी, जॉनी लिव्हर, आदित्य पांचोली यांच्यासह अन्य कलाकारांनीही श्रद्धांजली वाहिली.
कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनामुळे त्यांचे मित्रपरिवार तसेच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. हा आजार चौथ्या टप्प्यातील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. तसेच ज्युनिअर मेहमूद अधिक काळ आयुष्य जगू शकणार नाहीत,असेही डॉक्टरांनी सांगितले होते.
आणखी वाचा
ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS
SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या