ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Published : Dec 08 2023, 12:04 PM IST / Updated: Dec 08 2023, 12:21 PM IST

junior mehmood passed away

सार

Junior Mehmood Passed Away : बॉलिवूडमधील कित्येक सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारे कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Junior Mehmood Passed Away : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते व कॉमेडियन ज्युनिअर मेहमूद (Junior Mehmood) यांची कॅन्सरशी झुंज अखेर संपली आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कॅन्सर आजाराशी लढा सुरू होता. डॉक्टरांनीही सांगितले होते की ज्युनिअर मेहमूद यांच्याकडे केवळ 40 दिवसांचेच आयुष्य आहे. 

त्यांचे जवळचे मित्र मित्र सलाम काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच वर्षी कॅन्सर आजाराबाबत निदान झाले होते. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांनीही ज्युनिअर मेहमूद यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. जितेंद्र यांना पाहून ते बरेच भावूक झाले होते.

दुपारी 12 वाजता पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

ज्युनिअर मेहमूद यांचे मित्र सलाम काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मेहमूद यांना फुफ्फुस आणि यकृताचा कॅन्सर झाला होता. यासोबतच आतड्यांमध्ये ट्युमर असल्याची माहिती समोर आली होती. हा आजार चौथ्या टप्प्यात पोहोचल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. काही दिवस ते लाइफ सपोर्ट सिस्टमवरही होते”.

दरम्यान, ज्युनिअर मेहमूद यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (8 डिसेंबर) दुपारी 12 वाजता सांताक्रूझ पश्चिम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही काझी यांनी दिली आहे. ज्युनियर मेहमूद यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कित्येक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजलीही वाहिली.

ज्युनिअर मेहमूद यांची कारर्कीद

ज्युनिअर मेहमूद यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी जवळपास 200 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. 1967 साली त्यांनी ‘नौनिहाल’ (Naunihal Movie) सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. 

यानंतर परिवार, ब्रह्मचारी, फरिश्ता, विश्वास, प्यार ही प्यार, दो रास्ते, कटी पतंग, घर घर की कहानी, आन मिलो सजना, कारवां हंगामा, खोज, आपकी कसम, खूब का कर्ज, कर्ज चुकाना है, जुदाई यासारख्या सिनेमांमध्येही काम केले. 

याव्यतिरिक्त काही टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. तसेच जवळपास सहा मराठी सिनेमांचीही त्यांनी निर्मिती केली आहे.

आणखी वाचा

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

Bollywood Update : गुटख्याच्या जाहिरातीत आता हा सुपरस्टार दिसणार नाही, कारण…