सार

साउथ सुपरस्टार थलिपति विजयने राजकरणात एण्ट्री केली आहे. याशिवाय विजयने स्वत: च्या राजकीय पक्षाची घोषणा देखील केली आहे.

Thalapathy Vijay Political Party : तमिळ सिनेमांमधील सुपरस्टार थलापति विजयने (Thalapathy Vijay) राजकरणात एण्ट्री केली आहे. याशिवाय विजयने स्वत: चा राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने आपल्या पक्षाला Tamizha Vetri Kazhagam असे नाव दिले आहे. 

विजयचा पक्ष यंदाच्या वर्षात होणाऱ्या निवडणूका आणि अन्य राजकीय पक्षासोबत युतीही करणार नसल्याचे सांगितले जात आहे. पक्षासंदर्भातील हा निर्णय सर्वसाधारण आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी अपेक्षा केली जातेय की, राजकरणात विजयने एण्ट्री केल्यास तमिळनाडूच्या (Tamil Nadu) विकासाला गती मिळेल.

वर्ष 2026 मध्ये विधानसभा निवडणूक लढवणार विजय
शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विजयने म्हटले की, "आम्ही निवडणूक आयोगासमोर आमच्या पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करत आहोत. आमचे लक्ष्य आगामी वर्ष 2026 मधील लोकसभा निवडणूक लढवणे, जिंकणे आणि मूलभूत राजकीय बदल आणण्याचे आहे, जी नागरिकांची इच्छा आहे. हे नागरिकांसाठी पवित्र काम आहे. यासाठी मी दीर्घकाळापासून स्वत: ला तयार करत होतो. राजकरण माझ्यासाठी छंद नाही. ही माझी मनापासून इच्छा आहे. मला त्यात पूर्णपणे गुंतवून घ्यायचे आहे."

पक्षाचा लवकरच झेंडा आणि चिन्ह समोर येणार
निवडणूक आयोगाची पक्षाला मंजूरी मिळाल्यानंतर पक्ष सार्वजनिक बैठका आणि कार्यक्रमासंदर्भात तयारी करत आहे. जेणेकरून जनतेला आपली धोरणे आणि कामकाजाबद्दल कळेल. याशिवाय पक्षाचा झेंडा आणि चिन्ह देखील लवकरच लाँच केले जाणार आहे.

LEO सिनेमातून झळकला होता विजय
विजयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, थलापति विजय ‘लिओ’ सिनेमातून झळकला होता. लोकेश कनगराज यांनी सिनेमाचे दिग्दर्शित केला होता. सिनेमाने वर्ल्डवाइड 605.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता थलापति विजय 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (The Greatest of All Time) सिनेमातून झळकणार आहे. यंदाच्या वर्षातच सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक वेंकट प्रभू असून त्यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.

आणखी वाचा : 

Lock Upp स्टार पूनम पांडेचे निधन, इंस्टाग्रामवरील पोस्टमधून खुलासा

देशातील या सिनेमांचे बजेट अंतरिम अर्थसंकल्पापेक्षाही अधिक, जाणून घ्या

Shaitaan Teaser Out : "एक खेल है खेलोगे? इस खेल का बस एक नियम है", अजय देवगणाच्या 'शैतान' सिनेमाचा टीझर प्रदर्शित