सार

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पूनमच्या निधनाच्या बातमीसंदर्भातील एक पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवरील व्हेरिफाइड अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.

Model-Actor Poonam Pandey Dies : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले आहे. पूनमला गर्भाशयाचा कॅन्सर (Cervical Cancer) झाल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्रीच्या व्हेरिफाइड इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये पूनमचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

पूनम पांडेच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट
पूनमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिण्यात आलेल्या मेसेजमध्ये म्हटलेय की, पूनम पांडेचे आज (2 फेब्रुवारी) सकाळी गर्भाशयाच्या कॅन्सरने निधन झाले आहे.

पूनम पांडेच्या टीमकडून सांगण्यात येत आहे की, तिने आयुष्याचा अखेरचा श्वास आपल्या घरी कानपूर येथे घेतला आहे. तिच्या अंत्यसंस्काराबद्दलची वाट पाहिली जात आहे.

सोशल मीडियावर पूनमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया
पूनच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकाने म्हटले की, हे खरंच दु:खद आहे. दुसऱ्याने म्हटले, हे कसं शक्य आहे. याशिवाय अन्य एका युजरने म्हटले की, पूनमच्या निधनाची पोस्ट फेक तर नाही ना?

पूनमचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
पूनम पांडेने वर्ष 2013 मध्ये नशा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय टेलिव्हिजनवर काही रिअ‍ॅलिटी शो मध्ये देखील पूनम झळकली होती.

पूनमच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती अखेर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत द्वारे होस्ट केल्या जाणाऱ्या 'लॉकअप' (Lock Upp) टेलिव्हिजन शो च्या पहिली सीझनमध्ये झळकली होती. पूनमला या शो मध्ये जिंकली नव्हती. 

आणखी वाचा : 

शोएब मलिकची पत्नी सना जावेदच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप, दिल्या अशा प्रतिक्रिया

2024 मधील सर्वाधिक महागडा सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

बॉबी देओलने या अभिनेत्रींना लग्नाआधी केलेय डेट