सार

बॉलिवूडमधील अभिनेता अजय देवगण याचा अपकमिंग सिनेमा 'शैतान'चा टीझर गुरुवारी (25 जानेवारी) प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगणने सिनेमाचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सिनेमाचा टीझर पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.

Shaitaan Teaser : बॉलिवूडमधील अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) याचा अपकमिंग सिनेमा ‘शैतान’ येत्या 8 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिनेमाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाच्या टीझरमधील आर. माधवन (R. Madhavan) याच्या आवाजातील डायलॉग ऐकून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.

अजय देवगण सोबत सिनेमात साउथ सिनेमातील अभिनेत्री ज्योतिका (Jyotika) मुख्य भुमिकेत झळकणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये ज्योतिका खूप घाबरलेली दिसत आहे. इंस्टाग्रामवर अजयने टीझरचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, तो तुम्हाला विचारेल...एक खेळ आहे, खेळणार? त्याच्या मोहात पडू नका! #ShaitaanTeaser out now! सिनेमा 8 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शैतानच्या टीझरमध्ये काय दिसतेय?
शैतानच्या टीझरमध्ये आर माधवन याच्या आवाजातील घाबरवणारे डायलॉग तुमच्या मनात भीती निर्माण करणारे आहेत. सिनेमाच्या टीझरची सुरुवात आर. माधवनच्या डायलॉगने झाल्याचे दिसत आहे. याशिवाय टीझरमध्ये आर. माधवनाचा अर्धा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. 

VIDEO : मनाचा थरकाप उडवणाऱ्या ‘शैतान’ सिनेमाचा पाहा टीझर 

View post on Instagram
 

8 मार्चला प्रदर्शित होणार 'शैतान' सिनेमा
अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांची स्टारकास्ट असलेला ‘शैतान’ सिनेमा येत्या 8 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

सिनेमाचा टीझर प्रदर्शित केल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. एकाने म्हटले की, शैतानचा टीझर कमाल आहे. याशिवाय दुसऱ्याने म्हटले- शैतानची शैतानी सुरुवात आणि तिसऱ्याने म्हटले की, ब्लॉकबस्टर आहे सिनेमा. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया टीझरखाली दिल्या जात आहेत.

आणखी वाचा : 

हृतिक रोशनच्या Fighter सिनेमावर आखाती देशात बंदी, फक्त UAE मध्ये होणार प्रदर्शित

शोएब मलिकसाठी सानिया मिर्झाने SRKकडे मागितली होती ही मदत

यंदाच्या वर्षात प्रदर्शित होणार बॉलिवूडमधील हे Horror Movies