सार

Shreyas Talpade Health: 47 वर्षीय बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी (14 डिसेंबर, 2023) रात्री अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर श्रेयसला तातडीने अंधेरी येथील बेलव्ह्यू रुग्णालयात (Bellevue Multispeciality Hospital) दाखल करण्यात आले. श्रेयसची रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याच्या छातीत ब्लॉक आढळून आल्याने त्याच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली.

रिपोर्ट्सनुसार, सध्या श्रेयसची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. श्रेयसच्या हेल्थबद्दल त्याच्या परिवाराकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, श्रेयस गुरुवारी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत सिनेमा 'टू द जंगल' ची शूटिंग करत होता. शूटिंगनंतर घरी पोहोचल्यानंतर श्रेयसची अचानक प्रकृती बिघडली गेल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली.

श्रेयसच्या प्रकृतीबद्दल अपडेट
गुरुवारी दिवसभर शूटिंग केल्यानंतर श्रेयस घरी आला. घरी त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याने पत्नी दिप्ती हिला प्रकृती बिघडल्याचे सांगितले. श्रेयसची प्रकृती बिघडत चालल्याचे पाहून घरातील मंडळींनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

बेलव्ह्यू रुग्णालयातील डॉक्टरांनी श्रेयसचे चेकअप केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. यानंतर तातडीने श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या श्रेयसची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस त्याला रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्राने सांगितले की, शूटिंगदरम्यान श्रेयसची प्रकृती स्थिर होती. शूटिंगच्या सेटवरही तो सर्वांशी मजा-मस्ती करत होता. त्याने काही अ‍ॅक्शन सीन्सही शूट केले. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो घरी गेला आणि पत्नीला सांगितले त्याला अस्वस्थ वाटत आहे. यामुळे दिप्ती श्रेयसला घेऊन रुग्णालयात गेली.

श्रेयस तळपदेच्या कामाबद्दल थोडक्यात...

श्रेयस तळपदे याने काही मराठी सिनेमांसह बॉलिवूडमधील सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. वर्ष 2005 मध्ये आलेला सिनेमा 'इक्बाल' पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तसेच श्रेयसने 'डोर', 'अपना सपना मनी मनी', 'ओम शांति ओम', 'वेलकम टू सज्जनपूर', 'गोलमाल रिटर्न्स' अशा काही गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केले आहे. श्रेयस आता 'इमरजेंसी' या सिनेमात अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत काम करताना दिसून येणार आहे. हा सिनेमा नवं वर्षात (2024) मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात श्रेयस अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा: 

दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग, महिला जखमी

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीत शोककळा

Rajnikant Birthday : रजनीकांत यांचे Net Worth ऐकून व्हाल हैराण