Monalisa Wedding : मोनालिसा-फरमानच्या लग्नावरून वाद, त्याचे वडील म्हणाले 'नातं अमान्य', तर तिचे वडील म्हणाले 'मुलीला वाचवा'
Monalisa Wedding : प्रयागराज महाकुंभमुळे चर्चेत आलेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसाने बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केल्याने मोठा वाद सुरू झाला आहे. दोघांच्याही वडिलांनी या नात्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा विषय आता आणखीनच तापला आहे.
फरमान खानचे वडील जफर अली यांनी मुलगा आणि मोनालिसाच्या लग्नावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. हे नातं त्यांना मान्य नाही, कारण मुलगी हिंदू आहे आणि त्यांचं कुटुंब मुस्लिम जाट समाजातील आहे, असं ते म्हणाले. 'मी या लग्नामुळे खूश नाही. ती दुसऱ्या धर्माची आहे आणि आम्ही मुस्लिम जाट समाजाचे आहोत. यामुळे पुढे कुटुंबात अडचणी येऊ शकतात. फरमानने आम्हाला तो लग्न करणार आहे, हे आधी कधीच सांगितलं नाही. आम्हाला हा निर्णय मान्य नाही,' असं त्यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं.
फरमानचा भाऊ शमद म्हणाला की, त्याला या लग्नाची माहिती मीडियाकडून मिळाली. तो म्हणतो, ‘आम्हाला फरमानच्या लग्नाबद्दल मीडियातून कळालं. तो मोनालिसाशी लग्न करणार आहे, हे त्याने कधीच सांगितलं नाही. दोघांनी सिनेमात एकत्र काम केलंय एवढंच आम्हाला माहीत आहे, पण त्याचा हा निर्णय योग्य नाही.’
मोनालिसाचे वडील जयसिंह भोसले यांनीही आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आपली मुलगी सिनेमांमध्ये खूप पुढे जाईल, अशी त्यांना आशा होती. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, 'माझी मुलगी सिनेमात काम करून खूप पुढे जाईल, असं मला वाटलं होतं. पण अचानक कळालं की तिने लग्न केलं. हे सगळं कसं घडलं, हेच आम्हाला कळत नाहीये.'
47
Image Credit : Instagram
मोनालिसा घरी परत यायला तयार नाही
मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा आणि फरमानने केरळमधील एका मंदिरात लग्न केलं. मोनालिसाचे वडील म्हणाले, 'केरळमधून काही लोक आले होते आणि त्यांनी माझ्या मुलीला सिनेमात काम देण्याचं आणि अभिनय शिकवण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही त्यांच्यासोबत केरळला गेलो, पण तिथे जाऊन तिने फरमानशी लग्न केलं.' ते पुढे म्हणाले, 'मी तिला परत येण्यास सांगितलं, पण ती तयार झाली नाही.' जयसिंह यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना महेश्वरला परत पाठवलं. मोनालिसा १८ वर्षांची झाली असून, सज्ञान असल्याने तिला स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, असं पोलिसांनी सांगितलं. त्यांनी आपल्या मुलीवर जादू-टोणा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
57
Image Credit : Facebook
मोनालिसाच्या घराबाहेर मीडियाची गर्दी
मोनालिसाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, महेश्वरमधील वॉर्ड क्र. ९ येथील त्यांच्या घराबाहेर लोक आणि मीडियाची गर्दी जमली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता ते लपत-छपत घरात शिरले आणि त्यांना आपल्या मुलीच्या बाबतीत कुणाशीही बोलायचं नाहीये, असं ते म्हणाले. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या मते, त्यांना वाटत होतं की त्यांच्या मुलीला हिरोईन म्हणून आणखी सिनेमे मिळतील, पण तिला फसवून जाळ्यात ओढलं गेलं.
67
Image Credit : Facebook
गावात आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण
मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा विषय चर्चेचा बनला आहे. फक्त सोशल मीडियावरच नाही, तर दोघांच्या गावातही या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. मोनालिसाचे वडील म्हणाले, 'आता आमच्या हातात करण्यासारखं जास्त काही उरलेलं नाही. आमची मुलगी सुरक्षित राहावी आणि तिचं करिअर चांगलं व्हावं, एवढीच आमची इच्छा आहे.'
77
Image Credit : Facebook
मुख्यमंत्री यादवांकडे वडिलांची धाव
मोनालिसाचे वडील जयसिंह यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे मुलीला सुखरूप परत आणण्यासाठी मदतीची याचना केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते आपल्या मुलीला घेऊन विमानतळावर येत होते, तेव्हा काही लोक तिथे आले आणि तिला घेऊन गेले. इतकंच नाही, तर त्यांना तिथून हाकलून दिलं. त्यांना हा 'लव्ह जिहाद'चाच प्रकार वाटत आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.