दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग, महिला जखमी

| Published : Dec 14 2023, 01:14 PM IST / Updated: Dec 14 2023, 02:43 PM IST

sadashiv amrapurkar ahmednagar home fire

सार

Entertainment News : बॉलिवूडमधील दिवगंत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील घराला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एक महिला जखमी झाली आहे.

Sadashiv Amrapurkar Home Fire : बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) यांच्या अहमदनगरमधील (Ahmadnagar) घराला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच घरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कुटुंबीयांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या घटनेत एक महिला जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.

आग लागल्याची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रिपोर्ट्सनुसार घरातील सर्व सामान जळून घराचेही मोठे नुकसान झाले आहे. 

आग लागण्यामागील हे आहे कारण? 
दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटमधील घर पत्नी सुनंदा सदाशिव यांच्या नावावर असून ते भाडेतत्त्वार देण्यात आलेले आहे.  शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घराला आग लागल्याचे म्हटले जात आहे.

बुधवारी (13 डिसेंबर, 2023) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अमरापूरकर यांच्या घरामध्ये ज्योती भोर पथाने या महिला भाडेतत्त्वावर राहत आहेत.  

रिपोर्टनुसार, ज्योती यांना सुखरूप घरातून बाहेर काढल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता ज्योती यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

सदाशिव अमरापूरकर यांचे जन्मस्थान 
सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म अहमदनगरमधील आहे. सिनेमात प्रसिद्धी मिळण्यापूर्वी सदाशिव अमरापूरकर हे नाटकात काम करायचे. ‘अर्धसत्य’ या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारर्कीदीस सुरुवात केली.

‘अर्धसत्य’ सिनेमामधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांना 60 हून अधिक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या करिअरमध्ये बहुतांश सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. अमरापूरकर यांनी ‘सडक’, ‘इश्क’, ‘फरिश्ते’, ‘आँखे’, ‘हुकूमत’, ‘हम हैं कमाल के’, ‘आग,’ ‘जंग’, ‘दो नंबरी’, ‘मेहरबान’, ‘कुली नंबर वन’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते. दरम्यान वर्ष 2014मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.  फुफ्फुसांमधील संसर्गामुळे त्यांचे निधन झाले होते. 

आखणी वाचा: 

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीत शोककळा

Rajnikant Birthday : रजनीकांत यांचे Net Worth ऐकून व्हाल हैराण

प्रभाससोबत बिग बजेट सिनेमात ‘अ‍ॅनिमल’फेम TRIPTI DHIMRIची एण्ट्री?