सार

अभिनेता अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत नुकतेच लग्न केले. सध्या सोशल मीडियामध्ये अरबाजच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अशातच अरबाज खान याच्या वडिलांनी त्याच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

Arbaaz Khan Wedding : अभिनेता-निर्माता अरबाज खान याने 24 डिसेंबरला (2024) मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मुंबईत लग्न केले. मेकअप आर्टिस्ट शूरा खान (Sshura Khan) हिच्यासोबत अरबाजने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अरबाज-शूराच्या लग्नाची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच अरबाजच्या वडिलांनी त्याच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूज18 या वृत्तसंस्थेशी बोलताना अरबाज खान याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी म्हटले की, त्याने लग्नाचा निर्णय घेतला होता. माझ्या मते, हा काही गुन्हा नाही. मी अरबाजसाठी आनंदीत आहे. अरबाज-शूराला वधू-वराच्या रूपात मी आशीर्वाद दिला आहे.

माझ्या परवानगी गरज नाही- सलीम खान
सलीम खान पुढे म्हणाले, मला वाटत नाही अरबाजच्या लग्नाबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज होती. तो तरूण, शिकलेला आणि समजूतदार आहे. अरबाज स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतो. यामुळे माझ्या परवानगीची गरज नाही हे देखील सलीम खान यांनी म्हटले.

अरबाज आनंदीत असेल तर दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. अरबाजने केवळ लग्न करणार असल्याचे मला सांगितल्याचे सलीम खान यांनी सांगितले.

आयुष्यात ढवळाढवळ नको
सलीम खान पुढे म्हणाले, मला वाटत नाही एखाद्याच्या आयुष्यात ढवळाढवळ केली पाहिजे. कारण यामुळे नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात.

अर्पिताच्या घरी पार पडला लग्नसोहळा
अरबाज खानने खासगी रूपात लग्नसोहळा बहिण अर्पिता खान शर्मा हिच्या घरी उरकला. या लग्नसोहळ्याला संपूर्ण खान परिवार आणि त्याचे काही मित्र उपस्थितीत होते.

अरबाजच्या लग्नानंतर त्याला चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. याशिवाय अरबाजने सोशल मीडियामध्ये आपल्या लग्नाचे काही फोटोही शेअर केले आहेत.

View post on Instagram
 
View post on Instagram
 

 

आणखी वाचा: 

सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटचे हे आहे रहस्य

Arbaaz Khan-Sshura Khan Wedding : अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावेळी मुलगा अरहानने सादर केला खास परफॉर्मेन्स, पाहा VIDEO

Happy Birthday Salman Khan : सलमान खानने भाचीसोबत साजरा केला वाढदिवस, बॉबी देओलची खास उपस्थिती (Watch Video)