सार

अभिनेता अरबाज खान याने रविवारी (24 डिसेंबर, 2024) दुसरे लग्न केले. अरबाज खानने सेलेब्स मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज आणि शूरा यांच्या विवाहाचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

Arbaaz Khan-Sshura Khan wedding : अभिनेता अरबाज खान याने सेलेब्स मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत मुंबईत लग्न केले. लग्नसोहळा अरबाज याची बहिण अर्पिता हिच्या घरी पार पडला. अरबाजच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण खान परिवारासह त्याचा मुलगा अरहान खान (Arhaan Khan) याने देखील उपस्थिती लावली होती.

अरबाजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शूरा खान सोबतच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण खान परिवार दिसून येत आहे. अरबाजच्या दुसऱ्या लग्नावेळी रवीना टंडन, फराह खान यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

अरहान खानचा खास परफॉर्मेन्स
वडिलांच्या दुसऱ्या लग्नावेळी मुलगा अरहान याचीही उपस्थिती दिसली. अरहान याने यावेळी अरबाज खानसाठी खास परफॉर्मेन्सही केला. अरहानच्या या परफॉर्मेन्सचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अरहानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला असून त्याच्या हातात गिटार आहे. अरहान गिटारवर स्पेशल म्युझिक वाजवत असल्याचा व्हिडिओ अरबाज आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसून येत आहे.

VIDEO : अरहान खान याचा स्पेशल परफॉर्मेन्स

View post on Instagram
 

अरबाज-शूरा खान लव्ह स्टोरी
शूरा खान आणि अरबाज यांची लव्ह स्टोरी 'पटना शुक्ला'(Patna Shukla)  सिनेमाच्या सेटपासून सुरू झाली होती. यावेळी पहिल्यांदाच अरबाज शूराला भेटला होता. पटन शुक्ला सिनेमाची निर्मिती अरबाज खान करत आहे.

शूरा खान ही प्रोफेशनल सेलेब्स मेकअप आर्टिस्ट असून तिने काही कलाकांरासाठी काम केले आहे. सोशल मीडियामध्ये शूरा खान फार अ‍ॅक्टिव्ह नसते. तरीही शूराचे लाखोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. शूराने रवीना टंडन, रवीनाची मुलगी राशा थडानी यांच्यासोबत काम केले आहे.

View post on Instagram
 

पापाराझींना पाहून लाजला

अरबाज खानने शूरासोबत लग्न केल्यानंतर नुकतेच त्यांना एकत्रित कारमध्ये स्पॉट करण्यात आले. यावेळी पापाराझींना पाहून अरबाज लाजल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अरबाजच्या या अशा वागण्यावरून आता युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

View post on Instagram
 

अरबाजचे दुसरे लग्न
56 वर्षीय अरबाजने शूरा खान हिच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. याआधी अभिनेत्याने मलाइका अरोरा हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. वर्ष 2017 मध्ये मलाइका आणि अरबाज हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. पण आजही ते मुलगा अरहान याची पालक म्हणून काळजी घेताना खूप वेळा दिसून येतात. तर मलाइकाने घटस्फोटानंतर आयुष्यात मुव्ह ऑन केले आहे. सध्या मलाइका अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे.

आणखी वाचा: 

हृतिक रोशनने या गोष्टीला नकार दिल्यामुळे प्रभास झाला सुपरस्टार

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे

OTT प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वाधिक महागडी वेब सीरिज माहितेय का?