सार

Salman Khan Birthday : बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खान आज (27 डिसेंबर, 2023) 58 वर्षांचा झाला आहे. प्रत्येक वर्षी सलमान आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करतो. यंदाही सलमानने आपला वाढदिवस काही खास मित्रांसह परिवारातील मंडळींसोबत साजरा केला.

Happy Birthday Salman Khan : सलमान खान याच्या वाढदिवसादिवशी भाची आयात हीचा देखील वाढदिवस असतो. यामुळे सलमान आणि आयात या दोघांनी आपला वाढदिवस एकत्रित साजरा केला आहे. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओही सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.

सलमान आणि भाची आयात यांच्या वाढदिवसानिमित्त अरबाज खान, अर्पिता खान शर्मा, हेलन, अलवीर खान, सोहेल खान, युलिया वंतूरसह अन्य परिवारातील मंडळी उपस्थितीत होती. याशिवाय बॉबी देओल याची देखील उपस्थितीत दिसून आली. बॉबी देओलने (Bobby Deol) सलमानला किस करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सलमानने भाचीसोबत साजरा केला वाढदिवस
सलमान खान एका कामासाठी दिल्लीत गेला होता. पण वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत परतला. यानंतर सलमानने भाजी आयात हिच्यासोबत मिळून केक कापला.

आयातने गुलाबी रंगातील केक कापला. तर सलमानचा केक आकाशी-काळ्या रंगातील होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी सलमानने काळ्या रंगाची टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. सलमानच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

View post on Instagram
 

सलमान खानच्या कामाबद्दल.…
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो 'टायगर-3' सिनेमात झळकला होता. या सिनेमात सलमान खान अभिनेत्री कतरिना कैफ आणि इमरान हाशमी देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. टायगर-3 सिनेमाचे मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केले होते.

याशिवाय सलमान आपल्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अपकमिंग सिनेमाची घोषणा करू शकतो हे देखील बोलले जात आहे. खरंतर सलमान लवकरच करण जौहरच्या एका सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा: 

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे

हृतिक रोशनने या गोष्टीला नकार दिल्यामुळे प्रभास झाला सुपरस्टार

पॉप स्टार दुआ लिपा सोशल मीडियात होतेयं ट्रोल, नक्की कारण काय? वाचा सविस्तर...