सार

Salaar movie :  ‘सालार’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर याचा रिव्हू शेअर केला जात आहे. अभिनेता प्रभासचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसरवर धुमाकूळ घालत आहे.

Salaar: Part 1 – Ceasefire : प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेला आणि प्रभास (Prabhas) स्टारर सिनेमा 'सालार पार्ट-1 सीझफाअर' 22 डिसेंबर (2023) रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. अशातच आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर युजर्सकडून X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

एका युजरने लिहिले आहे की, “सिनेमा पाहून अंगावर काटा आला. भारतीय सिनेमाचे हे सर्वाधिक मोठे कमबॅक आहे. उद्या सर्व रेकॉर्ड ब्रेक होतील.”

दुसऱ्याने लिहिले की, “बाहुबली परत आलाय. सिनेमा पाहून फक्त अंगावर काटे उभे राहतात.”

“जास्त अपेक्षा ठेवू नका. सिनेमागृहांमध्ये जाऊन सिनेमा पाहा आणि अनुभव घ्या” असेही एका युजरने लिहिले आहे.

 

 

पाच भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित

'सालार' सिनेमामध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय श्रुती हसन, मीनाक्षी चौधरी, शरण शक्ति आणि ईश्वरी राव या कलाकारांनीही सिनेमात भूमिका साकारली आहे. सालार सिनेमा जगभरात हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.

सालार सिनेमाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगमधूनच 45 कोटी रूपयांहून अधिक कमाई झाली आहे. अशातच प्रेक्षकांचे हे म्हणणे आहे की, सालार पहिल्याच दिवशी 95 कोटी रूपयांची कमाई करू शकतो.

आणखी वाचा: 

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे

OTT प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वाधिक महागडी वेब सीरिज माहितेय का?

कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहेत या टेलिव्हिजन अभिनेत्री