Entertainment

Bollywood

भारतातील सर्वाधिक महागडी Web Series

Image credits: social media

बॉलिवूड सिनेमापेक्षा दुप्पट बजेट

भारतातील सर्वाधिक महागडी वेब सीरिज तयार करण्यासाठी 200 कोटी रूपयांचा खर्च आला होता. या सीरिजचे बजेट शाहरूख खानचा ‘डंकी’ आणि रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ सिनेमापेक्षाही अधिक आहे.

Image credits: social media

अजय देवगण मुख्य भूमिकेत

सर्वाधिक महागडी भारतीय वेबसीरिज ही ‘रूद्रा: द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra: The Edge Of Darkness) आहे. या सीरिजमध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला आहे.

Image credits: social media

अजयने वेब सीरिजसाठी घेतली ऐवढी फी

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, वेब सीरिजसाठी अजय देवगण याने 125 कोटी रूपये फी घेतली होती.

Image credits: social media

वेब सीरिजचे बजेट

रूद्रा: द एज ऑफ डार्कनेसच्या प्रोडक्शनसाठी 75 कोटी रूपयांच्या आसपास खर्च झाला होता. अशाप्रकारे एकूण 200 कोटी रूपयांचा खर्च वेब सीरिज तयार करण्यासाठी आला होता.

Image credits: social media

शाहरूखच्या सिनेमापेक्षा वेब सीरिजचे अधिक बजेट

रूद्राचे बजेट ‘डंकी’  (85 कोटी रूपये) व ‘अ‍ॅनिमल’ (100 कोटी रूपये) पेक्षा अधिक आहे. आमिर खान याचा ‘लाल सिंह चड्ढा' सिनेमाचे बजेट 180 कोटी रूपये होते. 

Image credits: social media

OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली सीरिज

रूद्रा: द एज ऑफ डार्कनेस Disney + Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली होती. ही सीरिज ब्रिटीश शो लूथरचे हिंदीतील रिमेक आहे.

Image credits: social media

या भूमिकेसाठी अजय देवगणने घेतली फी

ब्रिटिश क्राइम थ्रिलर लूथरमध्ये इदरीस एल्बाने लंडन पोलिसांच्या गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. तर रूद्रामध्ये अजयने ही भूमिका साकारली आहे.

Image credits: social media

वेब सीरिजची स्टार कास्ट

राजेश मापुस्कर यांनी ही वेब सीरिज दिग्दर्शित केली होती. यामध्ये राशि खन्ना, ईशा देओल, अतुल कुलकर्णी, आशीष विद्यार्थी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Image credits: social media

वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती

रूद्रा: द एज ऑफ डार्कनेसचा पहिला सीझनचा प्रिमीअर मार्च 2022 मध्ये हॉटस्टारवर झाला होता. अजय देवगणच्या या वेब सीरिजला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते.

Image credits: social media