Naach G Ghuma Teaser : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि...., मराठीतील आगामी सिनेमा 'नाच गं घुमा' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

| Published : Mar 08 2024, 04:09 PM IST / Updated: Mar 08 2024, 04:11 PM IST

Naach G Ghuma Movie

सार

आज सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील आगामी सिनेमा ‘नाच गं घुमा’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Naach G Ghuma Teaser : मराठी सिनेसृष्टीतील आगामी सिनेमा ‘नाच गं घुमा’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले असून यंदाच्या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तो प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासंदर्भात मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Actor Swapnil Joshi) याने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सिनेमाचा टीझर झळकवला आहे.

स्वप्नील जोशीची इंस्टाग्राम पोस्ट
स्वप्नील जोशीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये ‘नाच गं घुमा’ सिनेमाच्या टीझरसह एक कॅप्शन लिहिले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच ! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत… ‘नाच गं घुमा’ !”

View post on Instagram
 

सिनेमातील स्टार कास्ट
सिनेमामध्ये स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रीया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, आशा ज्ञाते आणि शर्मिष्ठा राऊत झळकणार आहे. या सिनेमाची निर्मिती हिरण्यगर्भ मनोरंजन यांच्याकडून करण्यात आली आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. 

आणखी वाचा :

परिणीती चोप्रा आई होणार? विमानतळावरील लुकमुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेला उधाण

Ambani's च्या पार्टीमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्यांवर कंगना राणौतने साधला निशाणा, म्हणाली "5 Million दिले तरीही नाचणार नाही"

'DON 3' सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण