सार

बॉलिवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री सध्या ओव्हर साइज कपडे परिधान करत असल्याने ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय असेही काहीजण आता बोलू लागले आहेत.

Bollywood : बॉलिवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) गेल्या वर्षात राघव चड्ढासोबत विवाह केला होता. लग्नानंतर अभिनेत्रीला सातत्याने विमानतळावर स्पॉट करण्यात येत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्राला विमानतळावर ओव्हरसाइज शर्ट आणि पांढऱ्या रंगातील शॉट्समध्ये पाहिले गेले. परिणीचा हा लुक पाहून नेटकऱ्यांनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दलच्या चर्चा सुरू केल्या.

युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
परिणीतीचा विमानतळावरील लुक पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. एका युजर्सने म्हटले की, “सर्वजण एकत्रित लग्न करतायत आणि एकत्रित प्रेग्नेंट होतायत.” दुसऱ्याने म्हटले की, “परिणीतीसाठी मी खुप आनंदित आहे.” पण काहींनी परिणीती प्रेग्नेंट नसल्याचे म्हटले आहे.

परिणीती आणि राघव यांची प्रेम कहाणी
परिणीती आणि राघवने एकमेकांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर मे 2023 मध्ये साखरपुडा केला होता. यानंतर दोघांनी 24 डिसेंबरला उदयपुरमधील लीला पॅलेसमध्ये विवाह केला. दोघांनी इंग्लंडमध्ये एकत्रित शिक्षणही घेतले आहे. याच कारणास्तव परिणीती आणि राघव एकमेकांना आधीपासूनच ओखळत असून डेट करत होते.

आणखी वाचा :

Ambani's च्या पार्टीमध्ये परफॉर्मन्स करणाऱ्यांवर कंगना राणौतने साधला निशाणा, म्हणाली "5 Million दिले तरीही नाचणार नाही"

'DON 3' सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूडमधील या अभिनेत्र्यांकडून गरजूंना केली जाते कोट्यावधींची मदत