सार

कंगना राणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये परफॉर्मन्स करण्यांवर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut Cryptic Post : बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना राणौतने नुकत्याच सोशल मीडियावर लता मंगेशकर (Lata Mageshkar) यांच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ शेअर करत एक क्रिप्टिक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले होते की, तिची आणि महान गायिका लता दीदी यांची खूप प्रसिद्ध गाणी आहेत. तरीही आम्ही कधीच कोणत्या लग्नसोहळ्यात परफॉर्मन्स दिला नाही. कंगानाने खरंतर हा निशाणा त्यांच्यावर साधला आहे ज्यांनी अनंत आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगवेळी परफॉर्मन्स दिला होता. अशातच कंगनाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त झाले आहेत.

कंगनाची सोशल मीडियावरील पोस्ट
कंगनाने पोस्टमध्ये लिहिलेय की, "तुम्ही मला पाच दशलक्ष रुपये दिले तरीही मी येणार नाही." खरंतर, लता मंगेशकर यांनी लग्नामध्ये गाणे गाण्यासाठी नकार दिला होता त्यावेळी केलेले हे विधान आहे. पुढे कंगाने लिहिले की, "मी खूप आर्थिक समस्यांचा सामना केला आहे. पण लता मंगेशकर आणि मी आम्ही अशा दोन व्यक्ती आहोत ज्यांची गाणी सुपरहिट झाली आहेत. मला कितीही पैसे देऊन नाचण्याासाठी बोलावले तरीही मी कधीच लग्नसोहळ्यात नाचली नाहीय."

कंगनाने पुढे लिहिले की, "मला कितीही प्रलोभने दाखवली तरीही मी लग्नात डान्स केलेला नाही. काही सुपरहिट आयटम सॉन्गसाठी देखील विचारण्यात आले आणि अवॉर्ड शो पासून ही दूर राहिली. फेस आणि पैशांसाठी नकार देण्यासाठी एक मजबूत व्यक्तीमत्व आणि प्रतिष्ठा असावी लागते. आजकाल शॉर्टकटच्या काळआत तरुणांना हे समजून घेण्याची गरज आहे की, पैसा केवळ कमावला जाऊ शकतो पण तो इमानदारीचा असावा."

नेटकऱ्यांनी कंगनाच्या पोस्टवर दिल्या प्रतिक्रिया
कंगनाची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. एका युजरने लिहिले की, "तू एक बॉलिवूड सेलिब्रेटी असूनही तुला प्री-वेडिंगसाठी अंबानीनी का बोलावले नाही?", दुसऱ्याने लिहिले की, "तू प्रतिष्ठेबद्दल बोलूच नकोस."

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगवेळी शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांनी आरआरआर सिनेमातील स्टार रामचरण याच्यासोबत 'नाटू नाटू' गाण्यावर सुंदर परफॉर्मन्स दिला होता. याशिवाय आलिया आणि रणबीर कपूरनेही 'केसरिया' गाण्यावर डान्स केला होता.

आणखी वाचा : 

DON 3' सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला पॉप सिंगर रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स, जिंकली भारतीयांची मनं (Watch Video)

5 सिनेमे, 3 लग्न आणि 225 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा TV अभिनेता