सार

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला हॉलिवूडमधील पॉप सिंगर रिहानाने उपस्थितीत लावली होती. यावेळी रिहानाने आपला धमाकेदार परफॉर्मन्स देण्यासह भारतीयांची मनं देखील जिंकली आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनं अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चेंटचा प्री-वेडिंग सोहळा सुरू झाला आहे. या प्री-वेडिंगला हॉलिवूडमधील पॉप सिंगर रिहानाने आपला धमाकेदार परफॉर्मन्स दिल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारतीयांची रिहानाने जिंकली मनं
रिहानाने प्री-वेडिंगवेळी आपल्या गाण्यांनी स्टेजवर आग लावली. याशिवाय मुकेश अंबानी यांच्यासह संपूर्ण परिवारासोबत स्टेजवर रिहानाने डान्सही केला. या सोहळ्याला रिहानाने नियॉन रंगातील गिटरी सी-थ्रु ड्रेस परिधआन केला होता. याशिवाय आउटफिट लॉग रेड केपने कव्हर केले होते. प्री-वेडिंगवेळी रिहानाने स्वत:ला एक्सपोज करण्यापासून दूर ठेवल्याने भारतीयांकडून तिचे कौतुक केले जात आहे. याशिवाय प्री-वेडिंगचा सोहळा संपल्यानंतर रिहाना आज (2 मार्च) सकाळी 6 वाजताच्या विमानाने आपल्या मायदेशात परतण्यासाठी निघाली.

विमानतळावर रिहाना आली असता महिला पोलीस आणि तेथील पापाराझींसोबत तिने फोटोही काढले. रिहानाच्या या वागणुकीमुळे तिचे कौतुक केले जात आहे. एका युजर्सने लिहिले की, "आपल्या बॉलिवूडमधील कलाकारांपेक्षा ती उत्तम आहे." दुसऱ्याने म्हटले, “मला रिहाना खूप आवडते.”

View post on Instagram
 

अनंत-राधिकाचा प्री-वेडिग सोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा प्री-वेडिंग सोहळा 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान पार पडणार आहे. या कपलचा विवाह गुजरातमधील जामनगर येथे पार पडणार आहे. याशिवाय कपलच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना बॉलिवूड, उद्योग क्षेत्रासह, राजकीय मंडळी उपस्थितीत राहणार आहेत.

आणखी वाचा : 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगसाठी रिहाना दाखल, पण पॉप सिंगरचे लगेज पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

दीपिका आणि रणवीरच्या घरी लवकरच होणार चिमुकल्या बाळाचे आगमन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कपलने दिली आनंदाची बातमी

Dadasaheb Phalke Awards 2024 : शाहरुख खानला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी