सार

हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हरसह त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी समुद्रातून चार मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील पायलटचाही मृत्यू झाला आहे.

Hollywood Actor Christian Oliver Died : हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हरसह त्याच्या दोन मुलींचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. एका खासगी विमानाने तिघेही प्रवास करताना ही दुर्घटना घडली आहे. विमानाने उड्डाण केल्याच्या थोड्याच वेळात विमान कॅरेबिअन समुद्रात (Caribbean Sea) कोसळले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

ओलिव्हर "द गुड जर्मन" (The Good German) आणि वर्ष 2008 मधील अ‍ॅक्शन कॉमेडी सिनेमा "स्पीड रेसर" (Speed Racer) सिनेमातून झळकला होता. गुरुवारी (4 जानेवारी) एका खासगी विमानातून ओलिव्हर आपल्या दोन मुलींसोबत प्रवास करत होता. यादरम्यान, अचानक विमानाचा अपघात झाल्याने तिघांचा मृत्यू झाला.

पोलिसांना समुद्रात मिळाले मृतदेह
कॅरेबिअन समुद्रात विमान कोसळल्यानंतर तेथील मच्छीमार, गोताखोर आणि तटरक्षक मदतीसाठी पोहचण्याआधीच चार जणांचा मृत्यू झाला होता. विमानात ओलिव्हर याच्या दोन मुलींसह पायलटही होता.

पोलिसांनी समुद्रातून चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ओलिव्हरचे विमान गुरुवारी दुपारी ग्रेनाडाइन्स येथील एका लहान बेटावरुन सेंट लूसियाच्या दिशेने जात होते.

सुट्टीसाठी गेला होता ओलिव्हर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओलिव्हर आपल्या परिवारासोबत सुट्टीसाठी गेला होता. काही दिवसांपूर्वी ओलिव्हरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देत लिहिले होते की, "credits to his name, including a minor part in Tom Cruise movie "Valkyrie."

अभिनेता टॉम क्रूजसोबत सिनेमा
ओलिव्हरचे खरे नाव क्रिश्चियन क्लेप्सर होते. ओलिव्हरने 60हून अधिक सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय टॉम क्रूज यांचा सिनेमा 'वाल्किरी' (Valkyrie) मध्ये देखील लहान भुमिका साकारली होती.

आणखी वाचा : 

दीपिका पादुकोणला आई व्हायचंय? अभिनेत्री म्हणाली...

2024 मध्ये प्रदर्शित होणार देशातील हे 11 बिग बजेट सिनेमे

अंकिता लोखंडे-विक्की जैन यांचे रिलेशनशिप या कारणांमुळे आहे Unperfect