Marathi

Upcoming Movies in 2024

2024 मध्ये प्रदर्शित होणार देशातील हे 11 बिग बजेट सिनेमे

Marathi

इंडियन2 (तमिळ)

तमिळ भाषेतील 'इंडियन2' सिनेमात कमल हसन मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन एस. शंकर करत असून याचे बजेट 250 कोटी रूपये आहे.

Image credits: Instagram
Marathi

बड़े मियां छोटे मियां (हिंदी)

10 एप्रिल, 2024 रोजी 'बड़े मियां छोटे मियां' सिनेमा प्रदर्शित होईल. सिनेमाचे अली अब्बास जफर दिग्दर्शन करत आहेत. अक्षय कुमार-टायगर श्रॉफ स्टारर या सिनेमाचे बजेट 350 कोटी रूपये आहे.

Image credits: Instagram
Marathi

बैजू बावरा (हिंदी)

‘बैजू बावरा’ सिनेमाचे संजय लीला भंन्साळी दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाचे बजेट 250 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Image credits: Instagram
Marathi

टायगर Vs पठाण (हिंदी)

सलमान खान-शाहरूख खान स्टार टायगर Vs पठाण सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. या सिनेमाचे बजेट 300 कोटी रूपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Image credits: Instagram
Marathi

Kalki 2898 AD (तेलुगू)

नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखालील ‘Kalki 2898 AD’ सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमा 12 जानेवारीला प्रदर्शित होणार असून याचे बजेट 600 कोटी रूपये आहे.

Image credits: Instagram
Marathi

DON3 (हिंदी)

'डॉन3' सिनेमाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार असून रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचे बजेट 200-250 कोटी रूपयांच्या आसपास असू शकते.

Image credits: Instagram
Marathi

पुष्पा 2: द रूल (तेलुगू)

अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2: द रूल’ सिनेमाची निर्मिती सुकुमार करत आहेत. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार असून याचे बजेट 500 कोटी रूपये आहे.

Image credits: Instagram
Marathi

इम्मोर्टल अश्वत्थामा (हिंदी)

रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन ‘इम्मोर्टल अश्वत्थामा’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या 600 कोटी रूपयांच्या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य धर करत आहेत.

Image credits: Instagram
Marathi

सिंघम अगेन (हिंदी)

‘सिंघम अगेन’ सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करत असून 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे बजेट 200 कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Image credits: Instagram
Marathi

SSMB29 (तेलुगू)

दिग्दर्शक एसएस राजमौली यांचा आगामी सिनेमा ‘SSMB29’ पुढील वर्षात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे बजेट 500-1 हजार कोटी रूपये आहे. या सिनेमामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Image credits: Instagram
Marathi

फायटर (हिंदी)

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर सिनेमाचे बजेट 250 कोटी रूपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार असून 25 जानेवारीला प्रदर्शित होईल.

Image Credits: Instagram