सार

सोशल मीडियावर नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेदने चक्क शाहरुख खान याच्यासोबतचा सेल्फी शेअर केला आहे.

Urfi Javed Viral Photo :  सोशल मीडिया इंन्फ्लूएंसर आणि आपल्या अतरंगी फॅशनमुळे उर्फी जावेदला ओखळले जाते. अशातच उर्फीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेदने चक्क बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) याच्यासोबत सेल्फी फोटो काढल्याचे दिसून येत आहे. उर्फीचा शाहरुख सोबतचा फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. याशिवाय दोघांच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.

उर्फीने शाहरुखसोबत काढला सेल्फी?
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर उर्फीने एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये उर्फीने शाहरुख खान सोबतचा सेल्फी फोटो शेअर केला होता. या फोटोवर मी माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटलीय असेही लिहिले होते. यावरच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फोटोमागील सत्य काय?
उर्फीचा शाहरुख खानसोबतचा सेल्फी फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमागील खरं सत्य वेगळेच आहे. खरंतर, स्नॅपचॅट अ‍ॅपमधील एका फिल्टरच्या माध्यमातून उर्फीने शाहरुख सोबतचा फोटो शेअर केला आहे. खरंतर, स्नॅपचॅट अ‍ॅपवर (Snapchat App) शाहरुखचा एक फिल्टर आहे तो वापरून उर्फीने फोटो तयार केला आहे.

उर्फीचा लेटेस्ट लुक
उर्फीचा लेटेस्ट लुकचीही सध्या जोरदार चर्चा आहे. या लुकसाठी उर्फीने काळ्या रंगातील शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये फिरती सूर्यमालाही दिसून येत आहे. उर्फीचा लुकला पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. याचेच फोटो आणि व्हिडीओ उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत. 

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

श्वेता तिवारीच्या सौंदर्याची मुलीसोबत केली जाते तुलना, पलकने म्हटले...

हमसे सनम क्या पर्दा...म्हणत प्राजक्ता माळीने केले कातिल फोटोशूट

प्रियांका चोप्राच्या देसी लुकने सर्वांना घातली भुरळ, सोशल मीडियात अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल