सार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुंबईत आली आहे. यावेळी प्रियांका अँटेलियामध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचली असता तिच्या देसी लुकने सर्वांना भुरळ घातली आहे. अभिनेत्रीचा गुलाबी रंगातील साडीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Priyanka Chopra in Pink Saree Video Viral : देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुंबईत आली असून तिचा हॉट अंदाजही पाहायला मिळाला. ईशा अंबानी (Isha Ambani) आणि बुल्गारी (Bvlgari) ब्रॅण्डच्या कार्यक्रमासाठी प्रियांकाने उपस्थिती लावली असता तिचा लुक पाहून सर्वजण घायाळ झाले आहेत. गुलाबी रंगातील साडीसारख्या ड्रेसमध्ये प्रियांका अतिशय सुंदर दिसत होती.

प्रियांकाच्या लुकची सोशल मीडियावर चर्चा
मुंबईतील अंबानी परिवाराच्या अँटेलियात (Antilia) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रियांका चोप्राने गुलाबी रंगातील साडी गाऊन परिधान केला होता. थाय हाय स्लिट आणि लो नेकलाइन ब्लाऊजचे डिझाइन गौरव गुप्ता यांच्या कलेक्शनमधील होते. याशिवाय प्रियांकाने स्मोकी आइज, न्यूड लिपस्टिक आणि सिंपल वेवी हेअरस्टाइलसह आपला लुक पूर्ण केला होता. प्रियांकाचा कार्यक्रमासाठीचा लुक पाहून सर्वजण तिच्या प्रेमात पडले आहेत.

View post on Instagram
 

लेकीसोबत भारतात आलीय प्रियांका
प्रियांका चोप्रा तिची लेक मालतीसोबत भारतात आली आहे. विमानतळावर प्रियांकाला तिच्या लेकीसोबत पापाराझींनी स्पॉट केले. या दोघींचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Amitabh Bachchan Health News Fake : अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत, प्रकृती बिघडल्याच्या बातम्या खोट्या

Oscars 2024 : ऑस्करच्या मंचावरील जॉन सीनाचा लुक पाहून सर्वजण हैराण, पण नक्की कारण काय? जाणून घ्या

'DON 3' सिनेमासाठी कियारा अडवाणीने घेतलीय एवढी फी, ऐकून व्हाल हैराण