TMKOC मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता व राज अनादकट यांनी गुपचुप उरकला साखरपुडा?

| Published : Mar 13 2024, 04:38 PM IST / Updated: Mar 14 2024, 12:52 PM IST

Munmun Dutta & Raj Anadkat

सार

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमधील अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि कलाकार राज अनादकट यांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.

Entertainment : टेलिव्हिजनवरील मालिका तारक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील बबीता आणि टप्पू यांचा खऱ्या आयुष्यात साखरपुडा झाल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. खरंतर, मुनमुन दत्ता (बबीता) आणि राज अनादकट (टप्पू) यांची लव्ह स्टोरी अनोखी आहे. दोघांमध्ये नऊ वर्षांच्या फरक आहे. मुनमुन दत्ता 36 वर्षीय असून राज हा 27 वर्षीय आहे.

रिपोर्ट्सनुसार, मुनमुन आणि राज यांनी छोटोखानी सोहळा आयोजित करत परिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. राजने वर्ष 2022 मध्ये तारक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून एक्झिट घेतली होती.

दोघांच्या परिवारांच्या उपस्थितीत झाला साखरपुडा
अभिनेत्रीच्या एका जवळच्या सूत्रांनी माहिती देत म्हटले की, मुनमुन दत्ता आणि राज यांनी मुंबई बाहेर साखरपुडा कला आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला आहे. या दोघांना एकमेकांच्या परिवाराने स्विकार केले आहे. खरंतर, या दोघांनी गुजरातमधील वडोदरा (Vadodara) येथे साखरपुडा उरकला असल्याचे बोलले जात आहे. 

राज आणि मुनमुन यांच्या डेटिंगची चर्चा
मुनमुन दत्ता आणि राज अनादकट कथित रुपात एकमेकांना डेट करत असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने वर्ष 2021 मध्ये दिली होती. रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील प्रत्येक व्यक्तीला मुनमुन आणि राज यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती होते. पण मुनमुनने तिचे राजसोबतचे असलेल्या चर्चांना खोटं ठरविले होते.

आणखी वाचा : 

AR Rahman Exclusive : भारतीय सिनेमा आणि संगीतला उंच स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे (VIDEO)

Oscars 2024 : ऑस्करच्या मंचावरील जॉन सीनाचा लुक पाहून सर्वजण हैराण, पण नक्की कारण काय? जाणून घ्या

बॉलिवूडमधील या अभिनेत्र्यांकडून गरजूंना केली जाते कोट्यावधींची मदत