सार

Shahrukh Khan Y Plus Security : शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आहे. किंग खानला आता Y Plus सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

 

Shahrukh Khan Y Plus Security News : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) वर्ष 2023 लकी ठरलं आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीस रिलीज झालेला त्याचा सिनेमा ‘पठाण’ (Pathaan Movie) ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि त्यानंतर ‘जवान’ सिनेमानंही (Jawan Movie) धमाका केला. 

'जवान' सिनेमा पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये गर्दी करताहेत. सिनेरसिकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. शाहरुख व त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब असली तरीही दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

जीवे मारण्याच्या धमक्या (Shah Rukh Khan Receives Death Threats) मिळत असल्याने शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan news) सुरक्षेत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. 

किंग खानला मिळालेल्या धमक्यांनंतर आता त्याला वाय प्लस (Y Plus Security) सुरक्षा पुरवण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखला अलीकडेच जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, यामुळे त्याची सुरक्षा (Shah Rukh Khan security cover increased to Y+ category) वाढवण्यात आली आहे.

View post on Instagram
 

 

शाहरुख खानला मिळाल्या जीव मारण्याच्या धमक्या

शाहरुख खानचा सुपरहिट ठरलेला सिनेमा 'पठाण' (Shah Rukh Khan Pathaan Movie) या वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरून मोठा वादही निर्माण झाला. यादरम्यान अभिनेत्याला मिळालेल्या धमक्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली. 

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखला (Y+ Security Shahrukh Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. पण या वृत्तास मुंबई पोलिसांकडून दुजारा मिळालेला नाही.

किंग खानसाठी सुरक्षाकवच

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभागाने नुकतीच याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर शाहरुख खानला वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाय प्लस सिक्युरिटी अंतर्गत शाहरुखला 11 सुरक्षा कर्मचारी मिळतील. 

यामध्ये सहा कमांडो, चार पोलीस कर्मचारी आणि एक ट्रॅफिक क्लिअरिंग वाहन आहे. यासह शाहरुखच्या ‘मन्नत’ (Bollywood News In Marathi) बंगल्याबाहेरही कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल.

View post on Instagram
 

 

शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘डंकी’

शाहरुख खानच्याच नावाची जादू यावर्षी बॉक्सऑफिसवर पाहायला मिळाली. शाहरुखच्या ‘पठाण’ व ‘जवान’ (Shah Rukh Khan Jawan Movie) या सिनेमांनी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 

आता 22 डिसेंबरला त्याचा ‘डंकी’ (Shah Rukh Khan Upcoming Movie) सिनेमा रिलीज होत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित सिनेमामध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचीही मुख्य भूमिका आहे.

आणखी वाचा

Animal New Poster : रणबीर कपूर-रश्मिका मंदानाचे लिपलॉक, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Shehnaaz Gill : शहनाज गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमके काय झाले-कशी आहे प्रकृती? चाहत्यांना स्वतःच दिले Health Updates

Tiger 3 Trailer : प्रतीक्षा संपली! दिवाळीपूर्वीच TIGER 3चा धमाका, भाईजानच्या सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

Aamir Khan Video : आमीर खानचा तो व्हिडीओ व्हायरल, तोल गेल्याचे पाहून लोक म्हणाले - PK है क्या?