Aamir Khan Video : आमीर खानचा तो व्हिडीओ व्हायरल, तोल गेल्याचे पाहून लोक म्हणाले - PK है क्या?

| Published : Oct 06 2023, 04:16 PM IST / Updated: Dec 26 2023, 01:21 PM IST

Aamir Khan Drunk
Aamir Khan Video : आमीर खानचा तो व्हिडीओ व्हायरल, तोल गेल्याचे पाहून लोक म्हणाले - PK है क्या?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

आमीर खानचा (Aamir Khan Viral Video) व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबईत झालेल्या एका पार्टीतील आहे. पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडताना त्याचा चक्क तोल गेल्याचे पाहायला मिळाले आणि याच व्हिडीओची आता जिकडेतिकडे चर्चा आहे.

Aamir Khan Video News : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा (Aamir Khan Viral Video) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमीर खान एका पार्टीतून बाहेर पडत असताना त्याचा चक्क तोल जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पार्टीमध्ये आमीर खानने (Aamir Khan) हजेरी लावली होती. 

आमीर खानला (Aamir Khan News) स्वतःलाच सावरणे कठीण होत असल्याचे पाहून सोशल मीडियावर नेटिझन्सकडून त्याला ट्रोल केले गेले. काही युजर्संनी तर आमीर दारूच्या नशेत असल्याचेही म्हटले आहे. काहींनी तरी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये ‘पीके है क्या?’ अशीही कमेंट केली आहे.

(Tiger 3 Trailer : प्रतीक्षा संपली! दिवाळीपूर्वीच TIGER 3चा धमाका, भाईजानच्या सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज)

आमीरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल - सावरे रे!

आमीर खानने (Aamir Khan Party Look) बुधवारी रात्री (4 ऑक्टोबर 2023) एका पार्टीमध्ये हजेरी लावली होती. पार्टीसाठी आमीरने निळ्या रंगाची पँट आणि आकाशी रंगाचा शर्ट असा कूल लुक कॅरी (Aamir Khan New Look) केला होता. दरम्यान पार्टीच्या ठिकाणाहून बाहेर पडताना आमीरचा तोल जात असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण दुसरीकडे याच वेळेस अभिनेत्री जिनिलीया डिसुझा - देशमुखला गेटमधून आत जाण्यासाठी जागा करून देत असतानाही त्याचा तोल गेला असू शकतो, हे सुद्धा नाकारता येत नाही. दरम्यान या व्हिडीओवरून आमीरचे चाहते आणि ट्रोलर्स यांच्यामध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

View post on Instagram
 

आमीर खानच्या व्हायरल व्हिडीओवर युजर्संनी केल्या अशा कमेंट्स

आमीर खानच्या या व्हायरल व्हिडीओवर एका युजरने कमेंट बॉक्समध्ये ‘पीके है क्या?’ अशी कमेंट केलीय. आणखी एका युजरने म्हटलंय की, “शंभर टक्के दारू प्यायला आहे आणि चांगल्या मूडमध्ये आहे”. आणखी एका युजरने मजेशीर कमेंट केलीय की, “आता इतक्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन लिंबू पाणी तर पिणार नाही”.

( ‘तेजस' सिनेमाचा टीझर रिलीज, क्वीन कंगनाची आणखी एक दमदार भूमिका )

View post on Instagram
 

आमीर खानचा नवा सिनेमा ‘लाहौर 1947’

दुसरीकडे आमीर खानने आपला नवा सिनेमा ‘लाहौर 1947’ ची नुकतीच घोषणा केली होती. या सिनेमामध्ये अभिनेता सनी देओल याचीही मुख्य भूमिका असणार आहे. राजकुमार संतोषी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

(Animal New Poster : रणबीर कपूर-रश्मिका मंदानाचे लिपलॉक, चाहत्यांनी व्यक्त केला संताप)