Tiger 3 Trailer : प्रतीक्षा संपली! दिवाळीपूर्वीच TIGER 3चा धमाका, भाईजानच्या सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

| Published : Oct 04 2023, 02:48 PM IST / Updated: Dec 26 2023, 01:20 PM IST

Salman Khan Film Tiger 3 Trailer
Tiger 3 Trailer : प्रतीक्षा संपली! दिवाळीपूर्वीच TIGER 3चा धमाका, भाईजानच्या सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Salman Khan Movie Tiger 3 Trailer : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचा आगामी सिनेमा ‘टायगर 3’च्या (Tiger 3 Movie) ट्रेलरबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

 

Tiger 3 Trailer Release Date Out : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सलमान खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा ‘टायगर 3’ (Tiger 3 Trailer) दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. पण दिवाळीचे फटाके फुटण्यापूर्वीच भाईजानकडून चाहत्यांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे.

काय आहे गिफ्ट?

‘टायगर 3’ सिनेमाच्या ट्रेलरबाबतची (Tiger 3 Trailer Release Date Out) मोठी माहिती समोर आली आहे. 16 ऑक्टोबर 2023 ला या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. ट्रेड अ‍ॅनॅलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ‘टायगर 3’ सिनेमाच्या (Tiger 3 Trailer Release Date) ट्रेलर रिलीजबद्दलची माहिती दिली आहे. 

सलमान खानचा फोटो शेअर करत तरण आदर्श यांनी लिहिलंय की, ‘टायगर 3 सिनेमाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तुम्ही तयार आहात का? ’

#SalmanKhan #Tiger3 #Tiger3Movie #KatrinaKaif #YRFSpyUniverse #ManeeshSharma #Diwali2023

View post on Instagram
 

सलमान खानचा ‘Tiger 3’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

सिनेरसिक सलमान खानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) सिनेमाच्या रिलीजची (Tiger 3 Release Date) अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान ‘टायगर 3’ सिनेमा याच वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्सऑफिस गाजवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले जात आहे.

पण रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृतरित्या घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. यशराज फिल्म्स बॅनरच्या (Yash Raj Films) या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा (Maneesh Sharma) यांनी केले आहे. दुसरीकडे दिवाळीपूर्वीच (Diwali 2023) ‘टायगर 3’ सिनेमाच्या ट्रेलरचा (Tiger 3 Trailer Release News In Marathi) धमाका अनुभवण्यासाठी सिनेरसिकही आतुर आहेत.

सलमान खानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) सिनेमाचे बजेट

सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘टायगर 3’ (Tiger 3) तब्बल 300 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये चित्रित करण्यात आल्याची माहिती आहे. यशराज फिल्म्स हा सर्वात महागडा प्रोजेक्ट असल्याचं बोलले जात आहे. सिनेमामध्ये सलमान खानसह अभिनेत्री कतरिना कैफ (Salman Khan and Katrina Kaif's Tiger 3) आणि अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi Tiger 3) यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

इम्रान हाश्मी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टायगर 3’ हा सिनेमा ‘एक था टायगर’ (EK Tha Tiger) आणि ‘टायगर जिंदा है!’ (Tiger Zinda Hai) या सिनेमांचा सीक्वेल पार्ट आहे. वर्ष 2012मध्ये रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 335 कोटी रूपयांची कमाई केली होती.

तर वर्ष 2017मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘टायगर जिंदा है!’ सिनेमाने बॉक्सऑफिसवर तब्बल 565 कोटी रूपयांचा गल्ला कमावला होता. हे दोन दमदार व जबरदस्त सिनेमे पाहिल्यानंतर प्रेक्षक आता ‘टायगर 3’ सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहताहेत.

आणखी वाचा

‘तेजस' सिनेमाचा टीझर रिलीज, क्वीन कंगनाची आणखी एक दमदार भूमिका

Aamir Khan Video : आमीर खानचा तो व्हिडीओ व्हायरल, तोल गेल्याचे पाहून लोक म्हणाले - PK है क्या?

2024मध्ये खिलाडी अक्षय कुमारचे 7 सिनेमे झळकणार BOX OFFICE वर