Shehnaaz Gill : शहनाज गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमके काय झाले-कशी आहे प्रकृती? चाहत्यांना स्वतःच दिले Health Updates

| Published : Oct 10 2023, 12:51 PM IST / Updated: Dec 26 2023, 01:23 PM IST

shehnaaz gill admitted in hospital

सार

Shehnaaz Gill Admitted In Hospital : प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने अभिनेत्री शहनाज गिलला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Shehnaaz Gill News : सर्वांची लाडकी अभिनेत्री शहनाज गिलची (Shehnaaz Gill In Hospital With Food Poisoning) प्रकृती अचानक बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहनाज गिलचा ‘थँक यू फॉर कमिंग’ सिनेमा (Thank You For Coming) नुकताच 6 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाच्याच प्रमोशनमध्ये शहनाज गेल्या काही दिवसांपासून व्यस्त होती. सिनेमात शहनाजने (Shehnaaz Gill hospitalised) दमदार अभिनय केल्यानं तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याचदरम्यान शहनाजला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.

शहनाजला का करण्यात आले हॉस्पिटलमध्ये दाखल?

Food Poisoning झाल्याने शहनाजच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. इंफेक्शन झाल्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे वृत्त सोशल मीडियावर पसरताच तिचे चाहते काळजी व्यक्त करू लागले. म्हणूनच शहनाजने सोशल मीडियावर लाइव्ह (Shehnaaz Gill Live) येऊन आपल्या प्रकृतीची चाहत्यांना माहिती दिली. 

तिला नेमके काय झाले होते आणि आता तिची प्रकृती कशी आहे? याबाबतचे अपडेट्स तिनं स्वतः शेअर केले. शहनाजची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हावी, यासाठी चाहते प्रार्थन करताहेत. दुसरीकडे,'थँक यू फॉर कमिंग' सिनेमाची निर्माता रिया कपूरनेही शहनाजच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्टिपमध्ये जाऊन तिची भेट घेतली.

इंफेक्शन कशामुळे झाले?

शहनाज गिल आपला सिनेमा ‘थँक यू फॉर कमिंग’च्या (Thank You For Coming actress Shehnaaz Gill) प्रमोशनमध्ये व्यस्त होती.  यादरम्यान सँडविच खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडल्याचे तिने सांगितले. खूप त्रास होऊ लागल्यानंतर तिला उपचारांसाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

View post on Instagram
 

अनिल कपूर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

शहनाज गिलच्या हेल्थ अपडेटशी (Shehnaaz Gill Health Update) संबंधित व्हिडीओ पोस्टवर अभिनेते अनिल कपूर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल कपूर यांनी शहनाजला (Shehnaaz Gill News In Marathi) ‘मुमताज’ म्हणून संबोधले आणि लिहिलेय की, ‘तू मुमताजसारखी आहेस.. सर्वजण तुला पाहत आहेत आणि तुला पसंत करताहेत.’

शहनाजची दमदार भूमिका

‘थँक यू फॉर कमिंग’  (Thank You For Coming Movie) सिनेमामध्ये शहनाजने (Shehnaaz Gill Health News) ‘रुशी कालरा’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमात कनिका कपूर (अभिनेत्री भूमी पेडणेकर) या 30 वर्षीय अविवाहित महिलेची कहाणी पाहायला मिळणार आहे. या कॉमेडी सिनेमाचे दिग्दर्शन करण बुलानीने केले आहे तर सिनेमाची पटकथा राधिका आनंद व प्रशस्ती सिंगने लिहिली आहे.

View post on Instagram
 

आणखी वाचा

इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचाची सुखरूप घरवापसी

2024मध्ये खिलाडी अक्षय कुमारचे 7 सिनेमे झळकणार BOX OFFICE वर

‘तेजस' सिनेमाचा टीझर रिलीज, क्वीन कंगनाची आणखी एक दमदार भूमिका

Top Stories