सार

Ranbir Kapoor and Rashmika Mandanna Liplock Animal New Poster : आगामी सिनेमा ‘अ‍ॅनिमल’चे पहिले गाणे 11 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. पण सिनेमाच्या नव्या पोस्टरमधील या गोष्टीमुळे सोशल मीडियावर टीका केली जातेय. कारण…

 

Animal New Poster News : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) बहुप्रतीक्षित सिनेमा ‘अ‍ॅनिमल’चे (Animal) नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रश्मिका व रणबीर लिपलॉक (Ranbir Kapoor-Rashmika Mandanna kiss) करताना दिसताहेत. सिनेमाचे नवीन पोस्टर (Animal movie new poster) रिलीज केल्यानंतर निर्मात्यांनी आणखी एक आनंदाची बातमी सिनेरसिकांसोबत शेअर केली आहे. 

ते म्हणजे सिनेमाचे पहिले गाणे (Animal Movie New Song) 11 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. पण दुसरीकडे ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाच्या नवीन पोस्टरमधील एक कमतरता पाहून चाहते आपला राग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त करताहेत. राग अनावर होण्यामागील काय आहे कारण? जाणून घेऊया…

 

View post on Instagram
 

 

रणबीर-रश्मिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र

दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीचा सिनेमा ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर आणि साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना (Ranbir Kapoor And Rashmika Mandanna movie) मुख्य भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही नवी जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर- रश्मिका रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

View post on Instagram
 

रणबीर-रश्मिकाच्या काही चाहत्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर पाहून आनंद व्यक्त केला तर काही जण मात्र नाराज झाले आहेत. यामागील कारण असे की, पोस्टरवर केवळ रणबीरचंच नाव दिसत आहे.  रश्मिकाच्या नावाचा उल्लेखच नाहीय आणि यामुळेच अभिनेत्रीचा चाहतावर्ग नाराज झाला आहे. 

पोस्टरवर एका युजरने कमेंट करत म्हटलंय की, ‘ हे पोस्टर पाहून आलिया भट आणि विजय देवरकोंडा अस्वस्थ होतील.’ एकाने विचारलंय की, ‘अरे हे काय करत आहात?’आणखी एक युजरने म्हटलं की, ‘रणबीर कोणालाही सोडत नाही’.

1 डिसेंबरला BOX OFFICER झळकणार ‘ANIMAL’ सिनेमा

रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा ‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर (animal movie release date) झळकणार आहे. यापूर्वी हा सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ आणि अक्षय कुमारचा ’ओएमजी 2’ सोबत मोठ्या पडद्यावर होणारी टक्कर टाळण्यासाठी सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली. 

दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्या सिनेमात क्राइम-रोमँटिक अशा अनोख्या पद्धतीचा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील खास भूमिकेत दिसणार आहेत.

 

View post on Instagram
 

 

आणखी वाचा

Shehnaaz Gill : शहनाज गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमके काय झाले-कशी आहे प्रकृती? चाहत्यांना स्वतःच दिले Health Updates

इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचाची सुखरूप घरवापसी

Tiger 3 Trailer : प्रतीक्षा संपली! दिवाळीपूर्वीच TIGER 3चा धमाका, भाईजानच्या सिनेमाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज