Excessive hand washing: कोरोनासारख्या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोकांना सर्वाधिक सोपा उपाय म्हणून स्वच्छता ठेवणे आणि वेळोवेळी हात धुवावेत असा सांगण्यात आला होता. खरंतर स्वच्छता ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण दिवसातून सतत हात धुणे देखील आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. सतत हात धुण्याच्या सवयीमुळे त्वचेसंबंधित आजार निर्माण होऊ शकतात.
जे लोक अत्याधिक प्रमाणात हात धुतात त्यांची त्वचा अधिक कोरडी होते अथवा फाटते. यामुळे भविष्यात त्वचेशी संबंधित एक्झिमा ही समस्या उद्भवू शकते. एक्झिमा ही एक सामान्य स्थिती असली तरीही खाज येणे, लाल चट्टे येणे ही देखील या रोगाची कारणे ठरू शकतात. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, साबणातील रासायनिक पदार्थांमुळे त्वचेचे नुकसान होते.